राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट, या भागांत ‘यलो अलर्ट’

नागपूर :- राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता यंदा मॉन्सूनने निरोप घेतला. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. यंदा खरीपचे उत्पादन कमी झाले. तसेच रब्बीची लागवड कमी झाली. कारण राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये जलसाठा नव्हता. यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन दरवर्षीप्रमाणे सोडता आले नाही. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा कमी असल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा वापर करावा लागणार आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे वातावरण बदलले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सुरु झाला आहे. त्याचवेळी हवामान विभागाने चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे.

काय आहे हवामान विभागाचा इशारा

नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ११, १२ आणि १३ फेब्रुवारीसाठी हा अलर्ट दिला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, काढणीला आलेला हरभरा, तूर पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

पश्चिम बंगालमध्ये १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला, तेलंगणामध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला आणि केरळमध्ये १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्री छगन भुजबल को जान से मारने की धमकी, बढ़ी सुरक्षा

Sat Feb 10 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री और एनसीपी नेता छगन भुजबल को जान से मारने की धमकी मिली है. भुजबल के घर पर अज्ञात व्यक्ति का पत्र आया है. पत्र के जरिए जानकारी दी गई है कि उन्हें जान से मारने के लिए सुपारी दी गई है. इस पत्र के बाद नासिक पुलिस अलर्ट हो गई है. भुजबल के दफ्तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com