संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पोलीस चौकी मागील गोपाल अग्रवाल यांच्या गोदामात काम करणाऱ्या एका तरुणाचा गोदाम मधील शिडीवरून खाली पडल्याने रक्तबंबाळ होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव मोहम्मद मेहताब अश्ररफ अली वय 30 वर्षे रा खेडी फिरोजाबाद हल्ली मुक्काम लिहिगाव कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकोय रुग्णालयात हलविन्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.