भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

– अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली :- अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर ‍शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाहभत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि. 26 डिसेंबर 2024 च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना 11वी, 12वी तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जिल्हा व तालुकाच्या च्या ठिकाणी 5 कि.मी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी/12वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये 50% गुण असणे अनिवार्य आहे.तसेच या योजनेचा लाभ घणेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न् अडीच लाखापर्यंत असावे.

या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचितजाती व नवबौद्धप्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे या नवीन ऑनलाईन पद्धतीमध्ये नव्याने काही applicatation add झालेले आहेत.जसे की,SEND BACK BUTTON लाइव झालेले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना status allotment pending दाखवत आहे त्यांचे अर्ज ऑनलाईन send back करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्याना सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची त्रुटी पुर्तता करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज ऑनलाईन भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले लॉग ईन आय डी अर्ज approved प्रोसेसपर्यंत चेक करित रहावे जेणेकरुन कुठल्याही विद्याथ्याचा अर्ज पेंडींग राहणार नाही. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ.सचीन मडावी, यांनी केले आहे.

(टीप-Online site-https://hmasscrutinyworkflow.mahait.org/)

(विद्यार्थ्यानी स्वत: चा log in id व password टाकुन स्वत:चा status check करावा)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

07 फेब्रुवारी रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा आयोजित

Sat Feb 1 , 2025
गडचिरोली :- सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा 07 फेब्रुवारी 2025 रोजी (शुक्रवार) ला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तरी, भ्रष्टाचारासंदर्भात जनतेच्या काही तक्रारी असल्यास, त्या तक्रारकर्त्यांनी आवश्यक पुराव्यांसह सभेच्या दिवशी विहित वेळेवर उपस्थित राहुन सादर करावे. असे सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निमुर्लन समिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!