– ला. भु. विद्यालयात सामान्य ज्ञान बक्षीस वितरण संपन्न
कोंढाळी :- ‘देश घडवणारे, जबाबदार, शांतिप्रिय, पृथ्वीचे संरक्षण करणारे, समाजाचे कल्याण करणारे सुजाण नागरिक बना व आपले ध्येय आणि आई-वडील यांची कास कधीच सोडू नका’ असे आवाहन नागपूर शहराचे डी वाय एस पी (पी सी आर)डॉक्टर अशोक बागुल यांनी लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी येथे स्व. सुभाषजी राठी स्मृती प्रित्यर्थ आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभात केले. ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी होते. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा रेखा राठी,प्राचार्य सुधीर बुटे, उपप्राचार्य कैलास थुल,पर्यवेक्षक मनोज ढाले, हरिष राठी, परीक्षा प्रमुख सुनील सोलव आदी उपस्थित होते.
स्व. सुभाषजी राठी स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संस्थेमध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाते या स्पर्धेमध्ये एमपीएससी व यूपीएससीच्या पॅटर्न प्रमाणे परीक्षेचे आयोजन करून मुलांना स्पर्धा परीक्षांचा सराव देण्यात येतो व उत्तम करिअरच्या संधी या स्पर्धा परीक्षेतून कशा प्राप्त करता येऊ शकतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाते. यावर्षी एकूण १४३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तिन्ही गटातून सर्वसामायिक प्रथम बक्षीस धनश्री रवींद्र चोपडे वर्ग नऊच्या विद्यार्थिनीने प्राप्त केले. तिला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून मोबाईल टॅबलेट देण्यात आला. मिडल स्कूलच्या अ गटातून प्रथम क्रमांक अर्पिता राजेश चौबे द्वितीय निधी प्रदीप अंबुडारे व तृतीय क्रमांक रिया सुभाष पोकळे तिन्ही सातवीच्या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. त्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके ,बॅग, रिष्टवॉच,स्टडी टेबल बक्षीस म्हणून देण्यात आले.
वर्ग ८ ते १०च्या ब गटातून भावेश्री नामदेवराव शेंडे हिने प्रथम क्रमांक तर सम्यक नरेश नारनवरे द्वितीय, श्रावणी संजय सोमनकर व तन्मय नरेंद्र देशमुख यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थी वर्ग 10 चे आहेत.त्यांना डिजिटल वॉच, स्कूल बॅग व पुस्तके भेट देण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालय गटातून प्रथम क्रमांक रितेश कृष्णा युवनाते वर्ग अकरा विज्ञान, द्वितीय यशस्वी नासरे व तृतीय आयुषी चोपडे हिने प्राप्त केला. दोघीही 12 विज्ञानच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांना एंट्रन्स एक्झाम संदर्भातील पुस्तकांचा संच व स्कूल बॅग भेट म्हणून देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समिती प्रमुख सुनील सोलव यांनी डीवायएसपी डॉ. अशोक बागुल यांचा परिचय करून दिला व त्यानंतर प्राचार्य सुधीर बुटे यांनी या परीक्षा आयोजनामागील भूमिका विशद केली व सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रांजली मस्की व आभार प्रदर्शन अमोल काळे यांनी केले याच कार्यक्रमादरम्यान कुंडी सजावट स्पर्धा व क्रीडा बक्षीसांचेही वितरण करण्यात आले त्याचे संचालन हरीश राठी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रवीण गांजरे,अनंता बु-हान, हर्षल वानखेडे, रुपेश वादाफळे, प्रांजली मस्की, प्रमोद इंगुलवार, महेश घोगरे, अमोल काळे, महेश मलवे, मोहिनी भक्ते ,नितीन भैसारे, सोनाली ठवळे, संध्या भुते, ज्ञानेश्वर भक्ते ,श्याम धीरन, हर्षवर्धन ढोके, समीर लोणारे शुभम राऊत,आदींनी सहकार्य केले.