पावसाची चाहूल देणारा ‘मृग कीटक’(बिलबाबोटी) झाला दुर्मिळ

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 18:- एरवी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मृग किड्याचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले आहे. हे किडे फारसे दिसत नाहीत, असे निरीक्षण अनेक शेतकऱ्यांनी नोंदवले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक कीटकांची गर्दी रानावनात दिसते; परंतु मृगाचा किडा या सर्वांहून आगळावेगळा दिसतो. तो शेतजमिनीला हानीकारक उपद्रवी कीटकांचा फडशा पाडतो. यामुळे जमीन पिके पेरणीनंतर आलेल्या कोंबाचे रक्षण होते. जमिनीसाठी उपयुक्त बुरशी, कवके, जिवाणूजवळ मृग किडा राहतो. हा किडा बिलबाबोटी,गोसावी,पैसा, किटकूल नावानेही ओळखला जातो .मृग नक्षत्र संपून शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली तरीही या मृग किड्याचे दर्शन झाले नसल्याने शेतकऱ्यांचा मित्र असलेला मृग किड्याचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले आहे.
कोळी, नाकतोडे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. पहिल्या पावसात सरी बरसताना मृग नक्षत्रात या किड्याचा प्रवेश होतो. याच काळात हा किडा दिसतो. दोन आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर हा किडा दिसेनासा होतो. मृग नक्षत्रास प्रारंभ होताच एरवी शेत शिवारात मृगचा मृग किडा हमखास नजरेस पडायचा. मृग नक्षत्रात लालभडक रंगाचा एक किडा नांगरगट कुळवट झालेल्या शेतीवाडीत किंवा बांधांवर हा हमखास दिसतो.हा मृग किडा लालभडक रंगामुळे लक्ष वेधून घेतो व मृत झाल्याचे भासवतो आकार पाच ते सहा मिलिमीटर असतो .शरीराखाली कोळ्याप्रमाणे तोंड असते.लाल भडक रंगामुळे इतर किडे त्यावर हल्ला करीत नाहीत .मात्र आता हा मृग किडा दिवसेंदिवस गायब् होत चालला आहे.

हा कीटक ‘मृगाचा किडा’ गोसावी पैसा किटकूल नावाने ओळखला जायचा. हा कीडा दिसू लागला की, मशागत, धूळवाफ, पेरणी आदी कामे भराभर उरकली जायची, कारण पावसाच्या जोरदार आगमनाचे संकेत या किड्याद्वारे मिळत होते; परंतु यंदा मृग नक्षत्र संपले तरी हा किडा दिसला नाही, मृग नक्षत्र संपून बुधवारी (तारखेला २२ जून पासून) आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला तरीही मृग किड्याचे दर्शन झाले नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पूरग्रस्तांना मदत करा, खचलेला पूल पुन्हा बांधा ;माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Mon Jul 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी काटोलच्याअधिकाऱ्यांना धरले धारेवर नागपूर – पुरात शेतकरी, सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना तत्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना आज माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. पूरग्रस्त पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी काटोल तालुक्यातील पूल खचल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून धारेवर धरले. माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल, रविवारपासून जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com