संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22 :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम विकासासाठी कोटी रुपयांचा शासकीय निधी खर्ची घालण्यात आला मात्र या कामाचे ढिसाळपणामुळे राणी तलाव मोक्षधाम परिसर अजूनही विकसित होऊ शकला नसल्याने सोयी सुविधांचा अभाव प्राकर्षाने दिसून येतो परिणामी अंत्यसंस्कार कार्यक्रमात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो याबाबत कित्येकदा लोप्रतिनिधींना अवगत करण्यात आले त्यावर तोडगा काढत येथील लोकप्रतिनिधी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून कामठी आजनी रोड वर सुसज्ज असे मोक्षधाम उभारण्यात आले ज्याचे लोकार्पण येत्या 28 ऑगस्ट ला होणार आहे.तर हे मोक्षधाम सुरू झाल्यास राणी तलाव मोक्षधाम परिसर हे पर्यटक स्थळ म्हणूंन विकसित होणार असून या परिसरात अंत्यसंस्कार कार्यक्रम बंद करण्यात येणार असल्याची चर्चा रंगत आहे.वास्तविकता कामठी शहराची लोकसंख्या लक्षात घेता राणी तलाव मोक्षधाम हे जुने मोक्षधाम असून विविध धार्मिय नागरिकांचा अंत्यविधी कार्यक्रम पार पाडण्यात येत असतात.या मोक्षधाम च्या विकासासाठी शासनाचा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला मात्र त्या कंत्राटदारांना शरणावरचे लोचणे खायची सवय असल्याने या मोक्षधाम चा निधी स्वतःच्या घशात गिळंकृत करून पापाचे धनी बनले आहे.हा शासकीय निधी कुणाच्या बापाच्या हक्काचा नसून नागरिकांचा पैसा आहे तेव्हा लोकोपयोगी असलेले हे राणी तलाव मोक्षधाम परिसर अंत्यविधी साठी बंद न करता पूर्ववत पद्धतीने अंत्यविधी कार्यक्रमासाठी कायम सुरू ठेवावे असे न केल्यास येत्या 28 ऑगस्ट ला होणारा नवनिर्मित मोक्षधाम लोकार्पण कार्यक्रम विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा बहुजन रिपब्लिकन एकता मंच च्या वतीने मुख्याधिकारी ला दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आलेला आहे.
गरीब असो वा श्रीमंत कमी अधिक प्रमाणात जीवन जगण्यासाठी संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो परंतु काहींच्या मृत्यूनंतर हा संघर्ष थांबतो तर काहींना मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी सुद्धा संघर्ष सुरूच ठेवावा लागतो याचा प्रत्यक्ष अनुभव राणी तलाव मोक्षधाम परिसरात अंत्यसंस्कारित नातेवाईकांना आला आहे..तेव्हा प्रशासनाने जीवनातील संघर्ष भोगल्या नंतर मृत्य नंतरच्या मरणयातना थांबविण्यासाठी नव्याने स्मशानभूमी उभारण्याची व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करीत आजनी मार्गावर नवनिर्मित मोक्षधाम उभारण्यात आले असले तरी नवनिर्मित मोक्षधाम हे एका विशिष्ट समुदायासाठी (हिंदू)उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात येते ज्याचा येथील जागरूक नागरिकांसह बौद्ध समुदाय तीव्र विरोध करीत आहे.तेव्हा 28 ऑगस्ट ला होणारा सुनियोजित नवनिर्मित मोक्षधाम उदघाटन कार्यक्रम रद्द करून यासंदर्भात जनतेला खुलासा द्यावा अन्यथा 28 ऑगस्ट ला होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बरीएम तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या सामूहिक निवेदनातून केला आहे.
हे निवेदन बरीएम चे विदर्भ सचिव व कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांच्या नेतृत्वात देण्यात आले.याप्रसंगी शहराध्यक्ष दिपणकर गणवीर, माजी नगरसेविका सावलाताई गजभिये,उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर,अनुभव पाटील,अंकुश बांबोर्डे,विशाखाताई गेडाम, विशांत कुर्वे, रोहित भुते,प्रवीण लांजेवार, प्रणय शंभरकर, रोहित पाटील, मनीष डोंगरे आदी उपस्थित होते.
बॉक्स:-कामठी शहरात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असून शहरात कौमी एकतेचे वातावरण आहे.येथील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी विदर्भातील सर्वात मोठे कब्रस्तान म्हणून ओळख असलेले कामठी च्या छावणी च्या बाजूला असलेल्या कब्रस्तान मध्ये मुस्लिम समाज अंत्यविधी पार पाडतात यात फक्त मुस्लिम समाजबांधवांचेच अंत्यसंस्कार होत असतात हे इथं विशेष!याच तुलनात्मक परिस्थितीत ख्रिस्त समाजाचे सुद्धा एक वेगळी अंत्यसंस्कारित विशिष्ट जागेत सोय केली आहे तर येथील हिंदू म्हणून गणले जाणारे समाजबांधव विशेषतः कन्हान नदी घाटावरच अंत्यसंस्कार करतात , बोटावर मोजणारे हिंदू धर्मीय नागरिकच राणी तलाव मोक्षधाम परिसरात अंत्यविधी पार पाडतात मात्र येथील बौद्ध समाज हा आधीपासूनच आजनी रोड वरील जागेतील दहनभूमीत देहावसान झालेल्याना दहन अंत्यविधी पार पाडायचे तसेच राणी तलाव मोक्षधाम येथे अग्निविधी अंतर्गत अंत्यसंस्कार करायचे मात्र आता नवनिर्मित मोक्षधाम हे एका विशिष्ट समुदाया साठी मर्यादित असल्याचे दिसून येत असून या मोक्षधाम निर्मित समिती त एका विशिष्ट समुदायाचेच समाजबांधव सहभागी आहेत तर या मोक्षधाम वर जणू काही या समितीतील समाजबांधवांचाच वर्चस्व राहणार की काय ?अशी चर्चा आहे तेव्हा शासनाच्या कोटी रुपयांचा निधी खर्ची घालून उभारण्यात आलेला हा मोक्षधाम एका विशिष्ट समाजासाठी नसून सर्वधर्मीय नागरिकांसाठी उपयोगी पडावे अशी मागणी जनमानसात करण्यात येत आहे तर या मोक्षधाम ला एका विशिष्ट समाजापूरती मर्यादित केल्यास याचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचा ईशारा सुदधा बरिएम सह अन्य संघटनांनी बोलून दाखविला आहे.