एडुशन फाउंडेशन तर्फे करिअर मार्गदर्शनाचे चर्चासत्र संपन्न

नागपूर :- नवीन सुभेदार येथील एडुसन फाऊंडेशन येथे १२ मे रोजी करिअर मार्गदर्शनावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचा हेतू विद्यार्थ्यांना त्यांचा व्यावसायिक प्रगतिकरता, निवडलेल्या शिक्षणासोबत विविध कौशल्य पूर्ण उपक्रमाकरीता मानसिक कल तयार करणे हा होता. चर्चासत्रास अतिथी वक्ते एस बी जैन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. डी. बी. राणा, संस्थेचे संचालक निलेश काळे व सदस्य उमेश ठाकरे उपस्थित होते.

डॉ. राणा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व करिअर यशस्वी होण्यासाठी कौशल्यपूर्ण मानसिकता किती महत्त्वाची आहे यावर त्यांनी संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विकासासाठी आवश्यक असलेले जीवन कौशल्य आत्मसात करण्यास प्रवृत्त केले.

एडुसन फाउंडेशनचे संचालक यांनी विद्यार्थ्याना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील अडथड्यावर मात करण्यासाठी प्रोत्साहित केले व संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध विद्यार्थ्यांचा विकासाशी संबंधित उपक्रमाची माहिती दिली व संबोधित केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज काळे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात पेरणीपूर्व शेती मशागतीला आला वेग

Mon May 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात उन्हाचा प्रकोप असला तरी कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यास दूर ठेवत रखरखत्या उन्हात शेती कामे करण्यास सुरुवात केली आहे.अवघ्या महिनाभरात पेरणी करावी लागणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती मशागतीला वेग आल्याचे दिसत आहे. मागील काही वर्षापसून सतत दुष्काळ , वादळी वाऱ्यासह गारपीट याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी राजा होरपळून गेला होता तरी शेतकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com