– परिसरातील विकास व सौंदर्यीकरणास मिळणार प्रत्येकी ११ लक्ष  व १ लक्ष रुपयांचे रोख बक्षीस   चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २३ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेचे विजेते फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे घोषित करण्यात आले असुन सुंदर माझे उद्यान स्पर्धेत सिव्हील लाईन येथील जलमंदीर उद्यान संघ तर सुंदर माझी […]

– अमृत कलश रथाचे उदघाटन चंद्रपूर :- मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत घरोघरी जाऊन माती / तांदुळ संकलित करणाऱ्या अमृत कलश रथांचे उदघाटन १५ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आले. आपल्या घरातील थोडी माती किंवा माती उपलब्ध नसेल तर थोडेसे तांदुळ या अमृत कलशात अर्पण करून या राष्ट्रव्यापी […]

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन नागपूर :- सद्यस्थितीत नागपूरची ओळख आयटी हब, हेल्थ हब आणि एव्हिएशन हब म्हणून आहे. पण यासोबतच स्किल हब म्हणूनही नोंद होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन नागपूर जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ (स्किल युनिव्हर्सिटी) उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज […]

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संकुल मैदानावर अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे , कुलसचिव डॉ. राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकवर चार बाय शंभर मीटर मिक्स रिले शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या रिलेचा […]

– ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजने’चा थाटात शुभारंभ नागपूर :- वर्षानुवर्ष गावगाड्याचे अर्थव्यवस्था सांभाळणारे बारा बलुतेदार कामगारांनी बदलत्या काळात पुढे राहण्यासाठी आपल्या पारंपरिक व्यवसायात नवीन कौशल्य आत्मसात करून आधुनिकतेची कास धरावी या हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना’ सुरु केली आहे. कामगारांच्या विकासातून अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट साध्य होणार असून कामगार व कारागीर यांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा, […]

मुंबई :- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई :- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) विलास आठवले, उप सचिव ऋतुराज कुडतरकर, विधानपरिषद उपसभापती, यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष उडतेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन […]

– केंद्र व राज्य शासनाच्या महिलांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार मुंबई :- महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने सर्व जिल्ह्यांमध्ये दि. २ ऑक्टोबर, २०२३ ते दि. १ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ […]

मुंबई :- राज्यात आजपासून 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून “’सेवा महिना’’ अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता […]

· महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ · नमो कामगार कल्याण अभियानातून 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच · नमो शेततळी अभियानातून 73 हजार शेततळयांची उभारणी · नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून 73 गावे आत्मनिर्भर करणार · नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार · नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात 73 […]

छत्रपती संभाजीनगर :- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम […]

– मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही – अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा छत्रपती संभाजीनगर :- मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत 45 हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम […]

– कौशल्यप्राप्त मनुष्यबळ देशाच्या अर्थव्यवस्थेचे चालक बनतील – आयटीआय पदवीदान समारंभ               नागपूर :- उद्योग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार औद्योगिकरण व शिक्षण यांची सांगड घालून अभ्यासक्रमात केलेल्या बदलामुळे प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगांशी सामंज्यस्य करार करून त्यांच्याकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जो शिकेल, त्याला रोजगार […]

– काँग्रेस नेते के. राजु, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती नागपुर :- सन १९३५ च्या काळात ‘ब्रिटिशांनी आदिवासींवर अन्याय करणारा ‘आदिवासी क्षेत्रबंधन कायदा’ देशात लागू केला होता. या कायद्याने देशातील लाखो आदिवासी आपल्या हक्कापासून अनेक वर्षे वंचित राहिले. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७६ मध्ये घटना दुरुस्ती करून १८ सप्टेंबर १९७६ रोजी क्षेत्रबंधन उठविले […]

– 426 सामंजस्य करार, विदर्भातील 28 कंपन्यांचा सहभाग – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती नागपूर :- देशाच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होत असून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज उद्योग जगताला आहे. कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच उद्योगाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. ‘इंडस्ट्री मिट’ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

नागपूर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने सुरू असलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी रूद पालकृत याने 100 मीटर, 200 मीटर बैकस्ट्रोक व 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि या जलतरणच्या उपप्रकारामध्ये मंडन पातलोनमध्ये सुध्दा सुवर्णपदकाची कमाई केली. रुद पालकूत याने या स्पर्धेत एकूण चार पदक पटकावले. त्याचप्रमाणे चैतन्य चौधरी याने सुध्दा 100 मीटर व 50 […]

नागपूर :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर शहर, ग्रामीण व महीला आघाडी तर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक सहकारी बँक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दही हंडी भजन व्दारे, दहीहंडी फोडून, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांची यावेळी […]

– विद्यापीठात रोबोथॉन वर कार्यशाळेचे उद्घाटन अमरावती :- विद्याथ्र्यांना केंद्रस्थानी ठेवून विद्यापीठात विविध उपक्रम राबविले जातात. रोबोथॉन हा एक उत्कृष्ट उपक्रम असून त्या माध्यमातून नवनवीन उद्योजक निर्माण होतील, असे प्रतिपादन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ, विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि एम.डी.बी. इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा.लि. यांचे संयुक्त […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com