कमला नेहरू महाविद्यालयाच्या खेळाडूंना जलतरण स्पर्धेत सात सुवर्णपदक

नागपूर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने सुरू असलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाचा विद्यार्थी रूद पालकृत याने 100 मीटर, 200 मीटर बैकस्ट्रोक व 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि या जलतरणच्या उपप्रकारामध्ये मंडन पातलोनमध्ये सुध्दा सुवर्णपदकाची कमाई केली. रुद पालकूत याने या स्पर्धेत एकूण चार पदक पटकावले. त्याचप्रमाणे चैतन्य चौधरी याने सुध्दा 100 मीटर व 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये व 50 मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक प्राप्त केले. आता त्याची निवड मंडारा येथे होणान्या विभागीय क्रीडा स्पर्धेकरिता आलेली आहे.

अगर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी बंजारी, संस्थेच्या कोषध्यक्षा डॉ. स्मिता बंजारी यांनी जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक विजेते रूद्र पालकृत व चैतन्य चौधरी यांचे अभिनंदन करून राज्ज्य भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप बडवाईक आणि शारिरीक शिक्षक चेतन महाडिक यांनी रूद्र पालकृत व चैतन्य चौधरी यांचे गुच्छ प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले त्यांना उज्ज्वल भविष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

NewsToday24x7

Next Post

 'इंडस्ट्री मिट’च्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Sep 18 , 2023
– 426 सामंजस्य करार, विदर्भातील 28 कंपन्यांचा सहभाग – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती नागपूर :- देशाच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होत असून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज उद्योग जगताला आहे. कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच उद्योगाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. ‘इंडस्ट्री मिट’ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com