रोबोथॉन कार्यशाळेमुळे नवनवीन उद्योजक निर्माण होतील – डॉ. रविंद्र कडू

– विद्यापीठात रोबोथॉन वर कार्यशाळेचे उद्घाटन

अमरावती :- विद्याथ्र्यांना केंद्रस्थानी ठेवून विद्यापीठात विविध उपक्रम राबविले जातात. रोबोथॉन हा एक उत्कृष्ट उपक्रम असून त्या माध्यमातून नवनवीन उद्योजक निर्माण होतील, असे प्रतिपादन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ, विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि एम.डी.बी. इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा.लि. यांचे संयुक्त विद्यमाने ‘रोबाथॉन’ यावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अधिसभा सदस्य तथा एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन, अमरावतीचे सचिव आशिष सावजी, एम.डी.बी. इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा.लि. चे संचालक मंगेश भारती, नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर उपस्थित होते.

डॉ. रविंद्र कडू पुढे म्हणाले, विद्यार्थी टेक्नोसेव्ही व्हावे, यासाठी रोबोथॉन उत्कृष्ट उपक्रम आहे. दिवसभरामध्ये या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रशिक्षित होणार असून त्यांच्यातील नवनवीन कल्पना पुढे येतील आणि नवसंशोधनावर भर दिल्या जाईल, विद्यार्थी उद्योजक होतील. अमरावती शहरातील उद्योजकांना एकत्रित आणून विद्याथ्र्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यास जास्तीतजास्त उद्योजक तयार होण्याकरीता यशस्वी प्रयत्न होतील. स्टार्टअप, नवकल्पनांच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंगेश भारती मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार असून अनेक मुले आमच्या संस्थेने प्रशिक्षित केली आहेत. नामवंत संस्थांचे पारितोषिके विद्याथ्र्यांनी मिळविले आहेत. अनुपम नेरकर आठव्या वर्गातील विद्यार्थी वरीष्ठ प्रशिक्षक असल्याचे अभिमानाने त्यांनी सांगितले. विद्याथ्र्यांनी अर्निेग विथ लर्निंग करायला शिकले पाहिजे. काही विद्याथ्र्यांची ओळख त्यांनी याप्रसंगी करुन दिली.

कुलसचिव डॉ. तुषार देशमुख मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, तीन टप्प्यात कार्यक्रमाचे आयोजन केले असून विद्याथ्र्यांचा मोठया संख्येने सहभाग आहे. रोबोटशी संबंधित प्रशिक्षण मिळणार असल्यामुळे विद्यार्थी राष्ट्रीयस्तरावर सादरीकरण करु शकतील. उद्योजकतेकडे या माध्यमातून विद्याथ्र्यांचा कल राहणार असल्यामुळे विद्याथ्र्यांनी बक्षीस जिंकण्याचा या कार्यशाळेत प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

आशिष सावजी यांनी सांगितले, विद्यापीठात आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये उद्योजकता विकास सेल स्थापन करण्यात यावा, त्यामुळे विद्याथ्र्यांना उद्योजक होण्यास व मार्गदर्शन मिळण्यास फार मोठी मदत होईल. बँकांकडे निधी उपलब्ध आहे, विद्याथ्र्यांनी उद्योग सुरु करण्याकरीता पुढे आल्यास त्यांना निश्चितच बँका आर्थिक मदत करतील. उद्योजक म्हणून त्यांना आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. याशिवाय केंद्र शासनाच्या बचत गटासाठी असलेल्या योजनांचा सुद्धा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर म्हणाले, रोबोथॉनला विद्याथ्र्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येवू शकतो, त्यासाठी विद्याथ्र्यांनी पुढे यायला हवे. पाचही जिल्ह्रांत हा उपक्रम होणार असल्यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्याथ्र्यांना निश्चितच लाभ होणार आहे. टेक्नॉलॉजी शिकण्याकरीता महाविद्यालयातच गेले पाहिजे असे नाही, तर विद्यार्थी स्वत: टेक्नोसेव्ही होवून अनेक नाविन्यपूर्ण बाबी करु शकतात. रोबोथॉनचा वापर सर्वत्र होत आहे. विद्याथ्र्यांमध्ये ही कार्यशाळा उत्साह वाढविणार असून त्यांना विद्यापीठाकडून सर्वोतोपरी सहकार्य व मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. पाहुण्यांच्या हस्ते कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकतेतून कार्यशाळेमागील भूमिका आय.आय. एल. च्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनी मांडली. अनुपम नेरकर याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन अभय तायडे यांनी, तर आभार रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनचे सी.ई.ओ. आनंद यादव यांनी मानले. कार्यशाळेत 450 चे वर विद्यार्थी सहभागी झालेत.

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर शहर व ग्रामीण: श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात

Sun Sep 17 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना नागपूर शहर, ग्रामीण व महीला आघाडी तर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक सहकारी बँक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दही हंडी भजन व्दारे, दहीहंडी फोडून, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांची यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com