– राज्यातील 120 आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न नंदुरबार :- गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापुर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले. आज नंदुरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारतींचे […]

मुंबई :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यात रुजू होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मासिक विद्यावेतनाचा पहिला हफ्ता आज अदा करण्यात आला. […]

– नाट्यगौरव राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा मुंबई :- राज्याचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे महत्वपूर्ण कार्य रंगकर्मी, कलाकार करीत असतात. अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाआयुष्याला त्यांच्या बालपणीच सुरूवात झालली असते. बाल नाटकांचे महत्व लक्षात घेता राज्यातील बाल नाटकांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने 62 […]

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. व्यवसाय अभ्यासक्रम […]

· आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश मुंबई :- राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश झाला असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यातील अनुसूचित जाती / […]

– रेशीमबाग ले आऊट येथील खैरे कुणबी समाजभवन बांधकामाचे भूमिपूजन – बिडीपेठ येथे तिरळे कुणबी समाज भवन नूतनीकरणाचे भूमिपूजन – मानेवाडा येथील संत श्री सावता महाराज सांस्कृतिक भवनाचे डिजिटल पद्धतीने भूमिपूजन – वारकरी भवन बांधकामाचे भूमिपुजन नागपूर :- पंढरपूरला आषाढी किंवा कार्तिकी असो; संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी त्या ठिकाणी जातात. यात विदर्भातील वारकऱ्यांची देखील मोठी संख्या आहे. जवळपास आठशे वर्षापेक्षा जास्त […]

मुंबई :- महाराष्ट्रात गणेशोत्सवात महिला मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पुढील वर्षीपासून विशेष पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे […]

मुंबई :-टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात […]

नागपूर :- फिर्यादी नामे अजय रामचंद्र कवीमंडन, वय ६४ वर्षे, रा. प्लॉट नं. १३, पन्नासे कॉलोनी, आयटी पार्क रोड, प्रतापनगर, नागपूर हे त्यांचे अॅक्टीव्हा दुचाकी क. एम.एच ३१ ई. एक्स ०४३५ ने त्यांची नातीन नामे कु. पृथा आकाश पडि, वय १० वर्ष, हिला डान्स क्लास करीता, ऑरेंज सिटी चौक, येथे सोडण्याकरीता मागे बसवुन गोपाल नगर कडुन पडोळे चौकाकडे जात असता, […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत आरोपोंचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेश शिंदे वय २८ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३, नागपुर हा दिसल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता त्यास पोलीस ठाणे नंदनवन येथुन मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ४ […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कोराडी हटीत म्हाडा क्वॉर्टर नं. ४८, राणा ले-आउट, गोधनी, नागपूर येथे राहणारा आरोपी नामे रवि गजानन महल्ले, वय ३० वर्षे, याचे घरासमोर होन्डा शाईन कंपनीची गाडी उभी असुन नमुद वाहन है चोरीचे आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन रेड कारवाई केली […]

नागपूर :- फिर्यादी प्रेमदास दामोदर पाटील, वय ३९ वर्षे, रा. प्लॉट नं. १२०, निलकमल नगर, नरसाळा, हुडकेश्वर, नागपूर हे त्यांची ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ४९ वि.डी ६२४५ ने जात असता, पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, सेंट झेव्हीअर शाळेजवळ, हिवरी नगर रोडवर, ऊभी करून लघुशंके करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस […]

नागपुर :-दिनांक ०८.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ कैसेस असे एकुण ०६ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून ५४,०९०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगार कायद्यान्यये ०२ केसेसमध्ये एकुण ११ इसमांवर कारवाई करून ५,२३,७८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध […]

– मनपाच्या विविध विकास प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण नागपूर :- नागरिकांच्या सेवेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा लवकरच कार्यान्वित होणाऱ्या “इंटिग्रेटेड इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम” अर्थात आयआयटीएमएस या अत्याधुनिक “एआय”च्या मदतीने चालणाऱ्या प्रणालीच्या वापरामुळे नागरिकांना शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल तसेच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाला मदत होईल. तसेच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या मदतीने पोहरा नदीला प्रदूषण मुक्त करण्यास […]

Nagpur :- 492 Cadet Training Officers (CTOs) of National Cadet Corps (NCC) Senior Division passed out from the folds of NCC Officers Training Academy at Kamptee, Maharashtra on 09 Oct 2024. The Parade was reviewed by Air Marshal Vijay Kumar Garg, AVSM, VSM, AOC-in-C Maintenance Command, Indian Air Force. The passing out course displayed high standards of drill as they […]

Ø विदर्भ-मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी १,७३४ कोटी Ø नागपूर जिल्ह्यातील वीज बळकटीकरण ३१३ कोटी कामाचा सुभारंभ Ø विदर्भातील शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान नागपूर :- शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार करण्यात आली असून त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या वापराचे नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून […]

नागपूर :- नागपूर महानगरपालीकेद्वारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टी बी संरक्षक लस गुरूवारी 10 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत उल्हासनगर बगीच्यात मोफत लसीकरण करण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे संयोजक व सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे सचिव सुरेश रेवतकर यांनी एका पत्रकात केले आहे. नागपूर महानगर पालिकेतील ईतर केन्द्रावर टीबी […]

– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत बैठक नागपूर :- १९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या सहविचार सभेचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात आमदार  सुधाकर अडबाले यांनी बैठक घेतली. बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान प्रलंबित प्रकरणे आजच निकाली काढा, अशी आमदार सुधाकर अडबाले यांनी तंबी दिली आणि जिल्ह्यातील ४ प्रकरणांना “ऑन द स्पॉट” मान्यता देण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com