नागपुर :-दिनांक ०८.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ कैसेस असे एकुण ०६ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून ५४,०९०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगार कायद्यान्यये ०२ केसेसमध्ये एकुण ११ इसमांवर कारवाई करून ५,२३,७८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६.३५१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,४०,२०० /- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राचविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.