नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कोराडी हटीत म्हाडा क्वॉर्टर नं. ४८, राणा ले-आउट, गोधनी, नागपूर येथे राहणारा आरोपी नामे रवि गजानन महल्ले, वय ३० वर्षे, याचे घरासमोर होन्डा शाईन कंपनीची गाडी उभी असुन नमुद वाहन है चोरीचे आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन रेड कारवाई केली असता, आरोपीचे घरासमोर दुचाको होन्डा शाईन क. एम. एच ३१ एफ.एल १६७७६ ही मिळुन आली. नमुद वाहनाबाबत आरोपीस विचारपुस केली असता, त्याने वर नमुद वाहन पोलीस ठाणे धंतोली हद्दीतुन कुंभार टोली रोडवरून चोरी केल्याची कबुली दिली, तसेच त्याचे जवळील अॅक्टीव्हा मोपेड गाडी क. एम.एच ३२ ए.पी १९०३ बाबत विचारपूस केली असता त्याने नमुद वाहन ग्राम चापर्डी, ज्ञानभुमी समोरून, पोलीस ठाणे कळंब हद्दीतुन चोरी केल्याचे कबुली दिली. अभिलेख तपासला असता पोलीस ठाणे धंतोली व पोलीस ठाणे कळंब, जि. यवतमाळ येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखखल असल्याचे समजले. आरोपीचे ताब्यातुन वाहन चोरीचे गुन्हयातील दोन्ही वाहने किंमती अंदाजे १,२०,०००/- रू. चे जप्त करण्यात आलेली आहे. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव धंतोली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविंद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पो. आयुक्त, नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि, राहुल शिरे, पोउपनि, राहुल रोटे, राजेश लोही, पोहवा, राजेन्द्र टाकळीकर, रूपेश नानवटकर, नापोअं, प्रविण भगत, गणेश ठाकरे, पोअं. विशाल नागभिडे, रोशन तांदुळकर, देवचंद थोटे, आशिष पवार व सुनिल यादव यांनी केली.