नागपूर :- विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी उपस्थिती लावली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी कधी यायचे,कोणत्या दिवशी यायचे, […]
नागपूर :- पात्र नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाने 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आणला आहे. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांमार्फत 486 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून सद्यस्थितीत 403 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर, मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरुपात पुरविण्यात येत आहेत. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितरित्या महाराष्ट्रात राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत लाखो लोकांनी मोफत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ करोडो लोकांनी घेतलेला आहे. या आरोग्यदायी योजनेच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र गोविंदाटोला नियत क्षेत्र मंगेझरी कक्ष क्रमांक 108 राखीव वन क्षेत्रात क्षेत्र सहाय्यक बी ए कोहर, एम .ए .बीसेन, आर डी तुरकर एन सी सेलगावे वनरक्षक व वनमजूर ग्रस्त बीटग्रस्त करते दरम्यान सागवान प्रजातीचे दोन थुट दिसून आले सदर थुटावर कोणत्याही प्रकारच्या वनउपज दिसून आला नाही सदर जंगलात 8 सप्टेंबरला […]
मुंबई :- जयपूरच्या रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाने समाजाला नवीन दिशा देणारा एक प्रखर धर्माचार्य आपण गमावल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आचार्य धर्मेंद्र हे देशातील हिंदू समाजाला नवी दिशा देणाऱ्या धर्माचार्यात प्रमुख होते. त्यांच्या भाषणांमुळे देशभरात एक नवचैतन्य निर्माण झाले. हिंदू समाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. जयपूरच्या […]
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.19) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव […]
नागपूर :- निसर्गतः मिळालेल्या शारीरिक मर्यादेवर मात करण्याची पूरक अशी शक्ती परमेश्वरानेच सर्वच दिव्यांग बांधवांना दिलेली असते. फक्त त्यांना कुणीतरी आपल्या पाठीशी आहे, एवढा विश्वास दर्शविण्याची गरज असते. एकदा हा विश्वास त्यांना मिळाला तर ते संपूर्ण जग जिंकण्याच्या मार्गावर यशस्वीपणे प्रस्थान करतात. याची प्रचिती नागपूर महानगरपालिकद्वारे केल्या जात असलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरण कार्यातून येत आहे. […]
जागतिक बांबू दिनानिमित्त चर्चास कृषि महाविद्यालयाचा उपक्रम नागपूर :- शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन, कापूस पिकावर अवलंबून न राहता इतर पर्यायी पिकांची लागवड करून पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज आहे. यासाठी वनशेती आणि विशेषतः बांबू लागवड हा उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषि […]
राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे आरोग्य व फिटनेस या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे समन्वयक डॉ.जयंतकुमार रामटेके यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यशाळेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला व संपूर्ण कार्यशाळेची माहिती दिली. कार्यशाळेत विविध तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले पहिल्या दिवशी आरोग्य आणि पोषण या […]
नागपूर :- दक्षिण भारतात पाखंड विरोधी व विज्ञानवादी दृष्टिकोन पसरवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, देवा धर्माच्या नावाने फसविणार्या पासून समाजाला सावधान केले, केरळच्या बायकोम सत्याग्रहात पुढाकार घेतला, दलित शोषितांच्या हितासाठी असलेल्या सायमन कमिशनचे बाबासाहेबांसारखेच समर्थन केले, अशा जस्टीस पार्टीचे संस्थापक असलेल्या तत्कालीन मद्रास (तामिळनाडू) मध्ये ज्यांची महापुरुष म्हणून गणना होते. असे दक्षिण भारतातील पेरियार रामास्वामी नायकर म्हणजेच महाराष्ट्रातील महात्मा […]
नागपूर :- प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त आशा पठाण यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
नागपूर :- प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
384 महाविद्यालयासाठी महत्त्वाची सूचना नागपूर :- 384 महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे जात पडताळणी अर्ज परिपूर्ण स्थितीत कसे स्विकारावे, त्रृटी कशी पूर्ण करावी, याबाबत प्रशिक्षण झाले आहे. त्यामुळे बारावीत असणाऱ्या जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज महाविद्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा जातपडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी केले आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी 11 व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातच स्विकारण्यात येईल. […]
नागपूर :- सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत, या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ,अर्ज,तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘सेवा पंधरवाडा’ राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या पंधरवड्यात शिधापत्रिकेसंदर्भातील सर्व सेवा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. सेवा पंधरवड्यात आपले सरकार वेबपोर्टलवरील संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व […]
लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आवाहन सेवा पंधरवडा :एकाच दिवशी 13 ठिकाणी शुभारंभ नागपूर :- बदलत्या तंत्रज्ञानाने पारदर्शिता वाढविली असून आता जनतेला अतिशीघ्र न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची असली पाहिजे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात नागपूर सेवा पुरविण्यात देशातला अव्वल जिल्हा ठरला पाहिजे. सोबतच ही प्रक्रिया यंत्रणेच्या कायमस्वरूपी अंगिभूत झाली पाहिजे, असा सूर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज व्यक्त केला. राज्यात आजपासून सामान्य नागरिकांच्या […]
औरंगाबाद :- मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. मुक्तिसंग्रामाच्या देदीप्यमान इतिहासाचे अत्यंत प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सहकार्याने आयोजित हे […]
मुंबई :- “स्वच्छ समुद्र-सुरक्षित समुद्र” अभियानात दोन ते तीन हजार युवक सहभागी होत आहेत. या युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेचा संकल्प करावा, हा संकल्प सर्वांपर्यंत पोहोचवावा,युवकांनी स्वच्छता आणि सुरक्षितेसाठी उचललेले पाऊल अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने मुंबईत पाच जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या 75 दिवसांच्या ‘स्वच्छ समुद्र, सुरक्षित समुद्र’ अभियानातंर्गत आज […]
मुंबई :- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उप सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रवींद्र खेबुडकर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे […]
मुंबई :- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले आहे. “प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राची पुरोगामी आणि सुधारणावादी प्रतिमा बळकट केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी म्हणून आणि मराठी संस्कृतीचे जतन यासाठी प्रबोधनकारांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील,’ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादनात म्हटले आहे.