म.ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व केन्द्र शासनाची प्रधानमंत्री जन योजनेचा लाभ घ्यावा..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितरित्या महाराष्ट्रात राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत लाखो लोकांनी मोफत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ घेतला आहे.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ करोडो लोकांनी घेतलेला आहे. या आरोग्यदायी योजनेच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांचे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीद्वारे आभार.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. ५ लक्ष वैद्यकीय संरक्षण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति वर्ष, प्रति कुटुंब रु. १ लक्ष ५० हजार पर्यंतचे विमा संरक्षण, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रु. २ लक्ष ५० हजार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध शिधापत्रिका/ फोटो ओळखपत्र व आयुष्मान कार्ड (PMJAY साठी) ची आवश्यकता आहे.

आपणास या योजनेमध्ये उपचारपूर्व तपासण्या, वैद्यकीय उपचार, प्रत्यारोपण साहित्य, शस्त्रक्रिया, रुग्णालयातील वास्तव्य, जेवण हे निःशुल्क उपलब्ध आहेत. उपचारानंतर परतीचा प्रवास खर्च योजनेअंतर्गत दिला जातो. या योजनांतर्गत हृदय शस्त्रक्रिया, मूत्राशयाचे आजार, हाडाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, कॅन्सर अशा १८३ उपचारांसाठी पाठपुरावा सेवादेखील मोफत दिली जाते.

महाराष्ट्रातील गरिब व तळागाळातील लोकांकरिता मोफत आरोग्य योजना राबविण्यासाठी वित्तीय अनुदान आणि वेळोवेळी प्रभावी अंमलबजावणीकरीता मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितरित्या अत्यंत उत्कृष्टपणे राबविण्यात येत आहे. असे उद्गगार महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी विविध रुग्णालयात भेटी प्रसंगी काढलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी पुणे येथील हॉस्पिटलमधील रुग्णांची भेट घेतली त्यांची आत्मीयतेने विचारपूस केली. तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या एकत्रित जन आरोग्य योजनेचा आढावा घेऊन प्राधान्याने अंमलबजावणी करीता मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे राज्य आरोग्य हमी सोसायटी आभार व्यक्त करीत आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा केंद्राच्या १५५३८८/१८००२३३२२०० किंवा १४५५५/१८००१११५६५ या क्रमांकावर निःशुल्क संपर्क साधावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in व www.pmjay.gov.in या वेबसाईट वर भेट द्या

आपणास व आपल्या कुटुंबियांस उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करावेत - अभय यावलकर

Tue Sep 20 , 2022
नागपूर :- पात्र नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाने 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आणला आहे. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांमार्फत 486 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून सद्यस्थितीत 403 सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर, मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरुपात पुरविण्यात येत आहेत. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com