वाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, 55 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना.

वाडी(प्र): वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत डॉ. आंबेडकर नगर रामजी चौक येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.आरोपी नामे चरणदास कुशन मेश्राम वय-५५ वर्ष हा रामजी चौक येथे वास्तव्य करतो.घटनेच्या दिवशी आरोपी बाजूलाच असलेल्या डॉ.आंबेडकर उद्यान परिसरात दुपारच्या वेळेला बसून होता,तर १० वर्षीय सीमा(काल्पनिक नाव) मुलगी खेळत होती यावेळी त्याने खाऊचे आमीष दाखवून तिला निर्जन स्थळी घेऊन गेला व तीचे सोबत बळजबरी करू लागला. एवढ्यात तिथे फेरफटका मारत असलेल्या काही युवकांनी हे दृश्य बघितले असता त्यानी आरोपीला पकडले व याबाबत विचारपूस केली असता त्याने थातूरमातूर उत्तर दिल्याने युवकांना संशय आला, त्यामुळे युवकांनी या नराधमांला चांगलाच चोप दिला,व तातडीने मुलीच्या आईला घटनेची माहिती दिली.तीने लागलीच वाडी पोलिसांना कळविले.वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले व मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने वाडी परिसरातील महिला-नागरिकांत मात्र खळबळ माजली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com