गैरकायद्याची मंडळी जमवुन मारहाण

भिवापुर :- अंतर्गत मौजा नक्षी शिवार ०५ किमी दक्षिण येथे दिनांक २३/०८/२३ चे दुपारी ०३/ ३० ते २०/०० वा दरम्यान, यातील फिर्यादी व त्याचा मित्र प्रशांत ढोरे व श्रावण वाघमारे असे तिघेही नक्षी शिवारात उभे असता निळ्या रंगाची महीन्द्रा रेन्ट गाड़ी ने मालक इमरान गोडीले ड्रायव्हर असे चार लोक येवुन फिर्यादीस हातबुक्यानी मारहान व काठीने मारपीट करून गाडीमध्ये बळजबरीने टाकुन उमरेड येथे घेवुन जावून गिट्टी खदानचे ऑफीस मध्ये बंद करून आणखी दोन लोक सुपरवाईजर शोयब शेख व ठेकेदार यांनी प्लास्टीकचे वायरने व लोखडी पट्टयाने मारहान केली व फिर्यादी याच्या मित्राला फोन करून ३० हजार रू ची मागणी करून मारण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे- राहुल आनंदराव देवढगले वय ३१ वर्ष रा. अहेर नवरगांव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. भिवापुर येथे आरोपी नामे- १) ईमरान असलम गोडील वय २५ वर्ष रा महेश नगर इतवारी २) अब्दुल सलीम कुरेशी वय ४७ वर्षे रा. मानकापुर नागपुर ३) हाबीद र मनसुरी वय ३२ वर्षे रा नया बाजार कामठी ४) सोयब रिजवान शेख वय २५ वर्ष रा. शारदा नगर खरबी नागपुर ५) फिरोज शेख नूर शेख वय २८ वर्ष रा, कावरापेठ उमरेड ६) अनिल बलराम ईरपाते वय २७ वर्ष रा. चारगाव गोटाळी ता. उमरेड यांचे विरूद्ध पोस्टे भिवापुर येथे कलम ३६४ (अ), ३४७,३२३,३२४१४३, १४७,१४८, १४९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास रोड पोउपनि बारई पोस्टे खापा हे करीत आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खून करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

Sat Aug 26 , 2023
कळमेश्वर :- अंतर्गत निमजी खदान, ०८ किमी दक्षिण. दिनांक २४/०८/२३ चे अंदाजे ०७/३० ते ०८/०० दरम्यान, मृतक रामबदन उत्तरी पासवान, वय ४० वर्ष याचे प्रेत हे निमजी खदान येथील तलावाचे पाण्यात मिळून आल्याने सदरचे प्रेत हे बाहेर काढून पाहणी केली असता, सदर मृतकाचे डोक्याचे टाळूवर मोठी गंभीर जखम दिसून आल्याने त्यास अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून कोणत्यातरी जाड व तिक्ष्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com