आज विभागीय आयुक्त बिदरी यांच्या हस्ते पंचायत समिती व ग्रामपंचायतीचा गौरव

नागपूर :- यशवंत पंचायतराज अभियानात राज्यस्तरीय व विभागीय पुरस्कार विजेत्या पंचायत समिती आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सरस ठरलेल्या विभागातील ग्राम पंचायतींना आज ५ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा वंसतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत नागपूर विभागातील वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२२-२३ च्या पुरस्कारांत राज्यस्तरावर व विभागात उत्तम ठरलेल्या पंचायत समितिंना गौरविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत विविध श्रेणीमध्ये सरसर कामगिरी करणाऱ्या नागपूर विभागातील ग्राम पंचायतींना वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ (एकत्रित पुरस्कार) आणि वर्ष २०१९-२०च्या पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या - उपमुख्यमंत्री

Mon Feb 5 , 2024
गडचिरोली :- मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले. मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसी च्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाशिवरात्रीला प्रथा परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला रोक न लावण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी केल्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com