झगडा सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– दोन तरुण गंभीर जख्मी. 

कन्हान :- शहरातील अशोक नगर परिसरात भर दिवसा झगडा सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर असामाजिक तत्वांचा सहा इसमांनी चाकु, काठीने प्राणघातक हल्ला करुन दोन तरुणांना गंभीर जख्मी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळखळ उडाली आहे.

पोलीसांकडुन प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२७) ला सकाळी १०.४० वाजता दरम्यान जख्मी युवक सय्यद शाहरुख रेश्मा सय्यद वय २६ रा. कन्हान हा मित्र लक्की नाईक यांचा सोबत पिपरी गाडेघाट रोड वर सुनिल उमरकर यांचा सलुन दुकाना शेजारी फुटपाथवर बसला होता. दोघेही बोलत असतांना दोन दुचाकी वाहनावर ६ व्यकती हातात चाकु, डंडे घेऊन आले. आरोपी विशाल नामदेव चिंचुलकर वय ३६ रा. कन्हान याने लक्की नाईक ला विचारले कि ” तु काल मला मारायला आला होतास का ? ” असे म्हणुन लक्कीला शिविगाळ करु लागला. तेव्हा आरोपी सुमेश भिमराव रामटेके वय ३१ रा. कन्हान याने जवळच्या काठीने लक्कीच्या मनघटावर मारून जख्मी केले. शाहरुख झगडा सोडायला गेला असता विशाल ने शिविगाळ करुन “तु मध्ये का येत आहेस ” , “अगोदर तुलाच टपकोतोय” असे म्हणुन विशाल ने दोन ते तीन वेळा शाहरुखवर चाकुने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वार चुकवित शाहरुख ने जीव वाचविण्यासाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता विशालने शाहरूख च्या डाव्या पायावर चाकुने मारुन जख्मी केले. सुमेश आणि त्यांचा साथीदारांनी शाहरुख च्या दोन्ही पायावर काठीने मारहाण केली. शाहरुख याने आपला जीव वाचवुन सुनील उमरकर यांचा दुकानात घुसला असता आरोपींनी सलुन दुकानात घुसन काठीने दुका नाचे काच फोडले आणि समोर उभ्या असलेल्या एम एच ४० एच ७८१५ क्र. च्या दुचाकी वाहनाचे काठीने हेडलाईट वर मारुन नुकसान केले.

सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन जख्मी शाहरुख ला प्रथम उपाचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ला नेले असता डॉक्टरांनी तपासुन त्यास मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केल्याने नागपुर ला उपचार सुरु आहे. कन्हान पोलीसांनी शाहरुख च्या तक्रारीवरून आरोपी विशाल चिंचुलकर, सुमेश रामटेके, अविनाश सहारे, रितेश चावके यांना अटक करुन ६ आरोपी विरुद्ध अप क्र. ७९८ /२३ कलम ३०७,२९४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात स पो नि अमितकुमार आत्राम हे करित असुन दोन आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वराडा येथे शालेय क्रिडा स्पर्धा संपन्न

Fri Dec 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- यशवंत विद्यालय वराडा येथे वराडा केंद्रा च्या केंद्रस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव पार पडला. स्पर्धेत वराडा केंद्रातील ११ शाळेच्या १०० विद्यार्थी खेडाळुनी कबड्डी, खो-खो, लंगडी, वैयक्तिक खेळ व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. वराडा केंद्रस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम भूषण निंबाळकर संचालक यशवंत विद्यालय वराडा यांचे अध्यक्षेत व्यंकटराव कारेमोरे सदस्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com