नागपूर :- केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या के.ई ३६० या विशेष विमानाने दुपारी २.२० वाजता आगमन झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे,कृष्णा खोपडे, परीणय फुके, सागर मेघे ,माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी शाह यांचे स्वागत केले. प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपिन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते.