Ø ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला उपस्थिती
नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता शासकीय विमानाने आगमन होईल. विमानतळावरुन रेशीमबागकडे प्रयाण करतील.
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत रेशीमबाग येथे आयोजित ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या कार्यक्रमासाठी दुपारी २ वाजता आगमन होईल.
कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वाजता विमानतळासाठी प्रयान करतील. सायंकाळी ४.३० वाजता येथून शासकीय विमानाने मुंबईसाठी प्रयाण करतील.