सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा – देवेंद्र फडणवीस

नागपूर :- नक्षलवाद्यांना राष्ट्रविघातक कार्यात मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगित केला आहे. नागपूर खंडपीठाचा यासंदर्भातील निकाल आश्चर्यजनक आणि धक्कादायक होता. समाज आणि राष्ट्रविरोधी कार्यात माओवाद्यांना थेट मदत केल्याचे इतके पुरावे असताना केवळ तांत्रिक मुद्यावर आरोपीला सोडून देणे, हे चुकीचेच होते. कालच्या काल आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो कारण, शहीदांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता. सर्वोच्च न्यायालयाने कालच खंडपीठ गठीत करुन आज त्यावर तातडीने सुनावणी घेतली, याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. जे पोलिस आणि जवान नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा हा निकाल आहे. सारे पुरावे उच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सुद्धा केवळ खटल्याच्या परवानगीचे तांत्रिक कारण सांगत ही सुटका झाली होती. आता यापुढे कायदेशीर लढाई होत राहील आणि साऱ्या बाबी आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाजकार्य महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाचा नव्वदावा वर्धापन दिवस साजरा

Sat Oct 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाचा नव्वदावा वर्धापन दिन व डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनीष मुडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. एपीजे अब्दुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights