अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक

– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई

भिवापूर :- पो.स्टे. भिवापूर हद्दीत स्टाफ पेट्रोलिंग व वाहतूक केसेस करीत असताना गोंडवोरी ते पेंढरी गावाचे डांबरी रोडवर १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-40/BI.-7445 येतांना दिसला, त्याचा पाठलाग करून गोडबोरी गावाजवळ येथे थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ०६ ग्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने टिप्पर ट्रक क्र. MH-40/BL-7445 किंमती २५,००,०००/- व त्यामध्ये ०६ ब्रास रेती किंमती ३०,०००/-रू. असा एकूण २५,३०,०००/- रू.या मुद्देमाल जप्त करून सदर टिप्पर चालक/मालक नामे राकेश रमेश गेडाम, वय ३५ वर्ष, रा. तास भिवापूर यांचेविरुद्ध कलम ३७९ भा. द. वी. सहकलम ४८ (७),४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अघी १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार, अपर पोलीस अधीक्षक , नागपूर ग्रा. डॉ. संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, पी. एस. आय. सदमेक, पोलीस हवालदार त्रिपाठी, आनंद धात्रक, पोलीस अंमलदार सूरज हिवरकर, चालक पोलीस अंमलदार सोरते यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोस्टे उमरेड हद्दीत जुगार अड्डयावर धाड

Wed Jan 31 , 2024
– पोलीस स्टेशन उमरेड ची कारवाई उमरेड :- दिनांक २८/०१/२०२४ रोजीचे १७/०० वा. ते १८/०० वा. दरम्यान आरोपी नामे (१) प्रशांत भागवत नेहते, वय ४९ वर्ष, (२) प्रफुल अशोकराव जांभुळे, वय ३४ वर्ष (३) संदिप मारोती मौदेकर वय ३२ वर्ष, तिन्ही रा. मंगळवारीपेठ उमरेड (४) विश्वनाथ चंद्रभान सदावर्ते वय ४८ वर्ष, (५) प्रशांत वामदेवराव कारगावकर वय ४० वर्ष, दोन्ही रा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!