तिरोडा उडान बांधकाम पुलामळे नागरिकांना होत आहे बेहाल ..

अमरदिप बडगे

गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा उडान पुलाचे कार्य सुरू असुन अपुऱ्या सुविधामुळे ठेकेदार लोकांच्या जिवा सोबत खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसुन येत आहे.

खैरलांजी रोड गौतम बुद्ध वॉर्ड गेट न. 520 येथे उडानपूल कार्याला सुरवात झाली असून ते काम एका ठेकेदार करित आहे. एप्रिल महिन्या पासून  उडान पुलाचे कार्य सुरु असुन सूचना फलक कुठे ही लावले गेले नाही, रस्ते तोडले पण दुसरे कोणते पर्याय मार्ग दिले नाहीत तसेच नाल्या तोडल्या गेल्या आहेत. परंतु सांड पाण्याची चे विलेवाट करिता कोणतीही योजना नाही. या वॉर्डातील लोकांची समस्या असुन त्यांचे जाणे येणाचे मार्ग सुद्धा बंद करून ठेवल्याचे दिसत आहे. रस्त्यावर माती जमा होऊन मोठा अपघात घडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

ऐन पावसाचे दिवस असुन या मार्गावर नेहमीच्या येणा-या जाण्याची वर्दळ सुरू असते. अशा वेळी अपघात होण्याचे सुध्दा दाट शक्यता असल्यानचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेच्या उपकरणाचे खूप अभाव दिसून  येत आहे,याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष दिले पाहिजे. अन्यथा मोठा अपघात होऊन हानी होऊ शकते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

Sun Jul 3 , 2022
   मुंबई, दिनांक ३ –  विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या बाजूने एकूण 164 सदस्यांनी मतदान केले. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर आणि राजन प्रभाकर साळवी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com