पोस्टे उमरेड हद्दीत जुगार अड्डयावर धाड

– पोलीस स्टेशन उमरेड ची कारवाई

उमरेड :- दिनांक २८/०१/२०२४ रोजीचे १७/०० वा. ते १८/०० वा. दरम्यान आरोपी नामे (१) प्रशांत भागवत नेहते, वय ४९ वर्ष, (२) प्रफुल अशोकराव जांभुळे, वय ३४ वर्ष (३) संदिप मारोती मौदेकर वय ३२ वर्ष, तिन्ही रा. मंगळवारीपेठ उमरेड (४) विश्वनाथ चंद्रभान सदावर्ते वय ४८ वर्ष, (५) प्रशांत वामदेवराव कारगावकर वय ४० वर्ष, दोन्ही रा. जोगीठाणापेठ उमरेड (६) महेश जनार्धन निखार वय ३८ वर्ष, रा. बुधवारीपेठ उमरेड, (७) गजानन गुनवंत हंगे वय ४० वर्ष, रा. घाटाळी रोड उमरेड (८) उत्तम रामकृष्णाजी सातव वय ४७ वर्ष रा. डहाके ले आऊट उमरेड जि. नागपुर हे मौजा शेव सिल्वर ओक शाळेच्या मागे शेत शिवारात सार्वजनीक ठीकाणी बावन्न ताश पत्त्यावर पैश्याची बाजी लावुन जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांच्या कडुन एकुण नगदी ४०५८०/- रू. तसेच पटनास्थळी मिळुन आलेल्या ०६ मोटार सायकली एकुण किंमती २,२५,०००/- रु. असा एकुण २,६५,५८०/- रू. चा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्दगर्शानाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पो.उप नि. वाय, पो.हवा. प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, रमेश खरकाटे, पोना पंकज बट्टे, पो.शि. गोवर्धन शहारे, नंदकिशोर शेन्डे, राजन भोयर यांनी पार पाडली.

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Wed Jan 31 , 2024
नागपूर :- दिनांक २९/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असता गुप्त माहिती मिळाली की, पो.स्टे, कन्हान हदीत बोर्डा टोल नाका येथे काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्देयतेने कोंबून वाहतुक करीत आहे, अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता आयशर ट्रक क्रमांक एम. एच. ४८/सौ. क्यू ५८०८ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com