क्रीडा भूषण पुरस्कारासाठी 24 जानेवारी पर्यंत अर्ज आमंत्रित 

– खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात होणार सन्मानित 

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतुन नागपुरात सुरु असलेल्या सहाव्या क्रीडा महोत्सवामध्ये 28 जानेवारीला महोत्सवाचा समारोप आहे. या समारोप कार्यक्रमात 19 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय, स्कुल नॅशनल, फेडरेशन नॅशनल या प्राविण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शहरातील खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत असून पात्र खेळाडूंनी बुधवार 24 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

क्रीडा भूषण पुरस्कारासाठी खेळाडूंनी खासदार क्रीडा महोत्सव कार्यालय, ग्लोकल स्क्वेअर, सीताबर्डी येथे बुधवार 24 जानेवारी पर्यंत सादर करावे. यासाठी काही अटी शर्ती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मागील 3 वर्षाची राष्ट्रीय स्थरावरील कामगीरी वर्ष 2020 ते 2024, आंतरराष्ट्रीय, स्कुल नॅशनल, फेडरेशन नॅशनल स्तराचे (प्राविण्य) प्रथम, द्वितीय, तृतीय याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, खेळाडू हा नागपूर जिल्हयाचाच असावा, 1 जानेवारी 2024 पर्यंत खेळाडू 19 वर्षाचा किंवा त्यापेक्षा कमी वयाचा असावा, इंडियन ऑलिम्पीक, एशियनची मान्यता असलेले खेळंच फक्त विचारात घेण्यात येतील या अटी शर्तींच्या अधीन राहून पुरस्कार्थींची निवड केली जाणार आहे. सर्व अधिकार खासदार क्रीडा मंडळाच्या निवड समितीकडे राहील, असेही समितीद्वारे कळविण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

पूर्व विदर्भ विभागीय शिवसेना कार्यालयात दामिनी राठोड यांची भेट

Sun Jan 21 , 2024
नागपूर :- धंतोली येथील पूर्व विदर्भ शिवसेनेच्या कार्यालयात दामिनी संजय राठौड़ (युवती सेना विदर्भ निरीक्षक) यांनी शनिवारी २० जानेवारी ला, त्यांच्या पूर्व विदर्भातील दौऱ्यानिमित्त शिवसेना पूर्व विदर्भ धंतोली कार्यालयात भेट दिली. त्यानिमित्ताने निलेश तिघरे युवासेना जिल्ह्याप्रमुख यांच्या नेतृत्वात नागपुर लोकसभा युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत युवासेने सोबतच युवती वाढविण्याच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून दामिनीताईनीं समस्त युवा सैनिकांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com