मराठी नाटकाला दिशा दाखवणारा समीक्षक हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने मराठी नाटक समृद्ध करणारा समीक्षक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संदेशात म्हणतात, नाडकर्णी यांनी नाट्य समीक्षेच्या माध्यमातून मराठी नाटकाला दिशा दाखवण्याचे कार्य केले. एक संवेदनशील लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम माणूस आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com