नागपूर :- धंतोली येथील पूर्व विदर्भ शिवसेनेच्या कार्यालयात दामिनी संजय राठौड़ (युवती सेना विदर्भ निरीक्षक) यांनी शनिवारी २० जानेवारी ला, त्यांच्या पूर्व विदर्भातील दौऱ्यानिमित्त शिवसेना पूर्व विदर्भ धंतोली कार्यालयात भेट दिली. त्यानिमित्ताने निलेश तिघरे युवासेना जिल्ह्याप्रमुख यांच्या नेतृत्वात नागपुर लोकसभा युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत युवासेने सोबतच युवती वाढविण्याच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून दामिनीताईनीं समस्त युवा सैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले व नागपुरातील युवासेना व युवती सेना वाढविण्यासाठी लागेल ती प्रत्येक मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच नागपुरसाठी नियमित दौरे सुद्धा करू असे शब्द सुद्धा दिले. याप्रसंगी शिवसेना महिला जिल्ह्या संघठिका मनिषा पापडकर, युवासेना शहर प्रमुख सलमान खान, पूर्व विदर्भ कार्यालय प्रमुख प्रफुल मानमोडे, उपजिल्हा प्रमुख निलेश सतीबावणे, पवन गुप्ता, शहर समन्वयक सोनु गड़ेकर, विधानसभा संगठक साहिल जैन, शिवसेना विभाग प्रमुख मनीषा पराड, सोशल मीडिया समन्वयक योगेश पौनिकर, उपशहर प्रमुख खेमचंद कैथेले, सुमित लिल्हारे, जीतू देवगडे, विवेक वर्मा, देवा बारामार, निलेश जाधव, रजत यादव, अमित कालभुत इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.