प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार करिता अर्ज आमंत्रित

गडचिरोली :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार हा 5 ते 18 वयोगटातील बालकांना दिला जातो. बाल शक्ती पुरस्कारासाठी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, पर्यावरण, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ, नवोपक्रम अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करित असलेल्या दिव्यांग बालकांना बाल शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार सन 2024-2025 या वर्षाकरिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत.

सन 2024-2025 साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी बालकानी 31 ऑगस्ट पर्यत http://awards.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

Mon Jun 3 , 2024
– कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसार माध्यमांची मोठी जबाबदारी – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह मुंबई :- विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसार माध्यमांची असल्याचे प्रतिपादन करीत या कार्यशाळेतील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com