‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता.परंतु ही तांत्रिक अडचणी संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारावे जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत.

मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये,असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 मध्य नागपूरात काँग्रेसकडून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार संपन्न

Sat Aug 3 , 2024
नागपूर :- मध्य नागपूरातील नागरिकांनी संविधानाच्या अधिकार व हक्कासाठी समाजात जागृती करून समाजसेवेचे कार्य केले, त्या ज्येष्ठ नागरिकांचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्कार कार्यक्रम गोळीबार चौकाजवळच्या हलबा सांस्कृतिक भवन,बागल आखाडा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज यांच्या छायाचित्रास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी माल्यपर्ण करून अभिवादन केले,त्यानंतर ज्येष्ठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!