स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणीचे महिलांना आवाहन

गडचिरोली :- कोणत्याही कठिण प्रसंगी महिलेला मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे आणि प्रत्येक ठिकाणी गरज भासल्यास मदत मिळणे सोपे व्हावे, याकरीता आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे द्वारा स्त्रीशक्ती पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर स्त्री शक्ती या पोर्टलव्दारे शासकीय / निमशासकीय / खासगी / विद्यालये / महाविद्यालये / जिल्हा परिषद शाळा / आशा वर्कर / अंगणवाडी सेविका / रुग्णालय / पोलीस विभाग / वकिल / महिला संबंधित काम करणाऱ्या संस्था तसेच इतर कोणतेही छोटे – मोठे व्यवसाय करणाऱ्या किंवा इतर ‍ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे व संकटकाळी मदत मिळणे तसेच मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी  प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली तसेच प्रणाली सुर्वे, केंद्र प्रशासक (प्र.), सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे. स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी कसे करायचे ? Google वर जावून strishakti.org या वेबसाईट वरुन महिलेचे सपूर्ण नाव, ई-मेल ‍किंवा मोबाईल क्र., पत्ता, जन्म तारिख टाकून नोंदणी करणे. तसेच पासवर्ड स्वत: तयार करुण घेणे. संपर्क कुठे करावा ? कार्यालय संपर्क क्रमांक :- 07132-295675 कार्यालय मोबाईल क्रमांक :- 9404354543 कार्यालय पत्ता :- जुनी धर्मशाळा,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Central Railway to run Exam Special Train 2 trips between Lokmanya Tilak Terminus-Nagpur-Lokmanya Tilak Terminus for candidates

Fri Dec 20 , 2024
Nagpur :- Central Railway will run Exam Special train 2 trips on Train on demand to clear extra rush between Lokmanya Tilak Terminus-Nagpur-Lokmanya Tilak Terminus for the benefit of candidates appearing for the exam. *The details are given below:* 02139 Examination special will depart from LTT at 00.55 hrs from 21.12.2024 arrive at Nagpur at 15.30 hrs same day. 02140 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!