मुंबई :- महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील रविवारी 118 वी जयंती असल्यामुळे राज्यपालांनी शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.