रेतीच्या टिपर ने ट्रैक्टरला धड़क दिल्याने एकाचा मृत्यूचा तर 6 जण गंभीर जखमी मालगांव मुरदाडा येथील घटना

अमरदिप बडगे

गोंदिया –  गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालगाव मूरदाडा येथे रेती ने भरलेल्या टिपर क्रमांकMH 35 AJ 4099 ने ट्रैक्टर क्रमांक MH 35 AG 0628 ला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर 6 लोक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.

प्रशांत आगासे, मृत्तकाचे नाव‌ असुन समस्त गावकऱ्यांनी रेती भरलेल्या टिपर ला जाळून टाकले आहे. गंभीर जखमींना गोंदिया येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दवनीवाडा पोलिस घटनास्थळी धाव घेतली असुन पुढील तपास सुरू आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com