नागपूर :- कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांपैकी आयकर पात्र सर्व निवृत्तीवेतन धारकांनी त्यांनी निवृत्तीवेतनाच्या उत्पन्नाच्या संदर्भात आवश्यक बचत केली असल्यास बचती विषयक माहिती विना विलंब कोषागारास बचत पत्राच्या झेरॉक्स प्रतीसह 9 डिसेंबरपर्यंत लेखी कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बचती विषयक माहिती प्राप्त न झाल्यास आयकर सूट मिळण्यासाठीची बचत केली नसल्याचे गृहीत धरून आयकर कपातीची कार्यवाही शासन नियमानुसार करण्यात येईल. याबाबत कुठल्याही प्रकारचा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही . ज्या निवृत्तीवेतन धारकाचे पॅन क्रमांक कोषागारात उपलब्ध नसल्यास त्यांनी तशी सहानिशा करावी अन्यथा शासनाच्या नियमानुसार सन 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये आयकर अधिनियमानुसार एकूण उत्पनाच्या 20 टक्के या दराने सरसकट आयकर कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.