अरोली :- रेल्वे स्टेशन असलेल्या निमखेडा येथील निस्पृह शिक्षण संस्था निमखेडा द्वारा संचालित श्री साईबाबा विद्यालय , कनिष्ठ महाविद्यालय व श्री साईबाबा स्कूल ऑफ लर्नर्स निमखेडा येथे उद्या दिनांक 25 जानेवारी शनिवारला वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेला आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व उद्घाटन सोहळा सकाळी अकरा वाजता पासून आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक अर्थ, नियोजन, कृषी ,कामगार, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र शासन तथा सह पालकमंत्री गडचिरोली आशिष जयस्वाल कार्यक्रमाचे अध्यक्ष द रुलर एज्युकेशन सोसायटी, नागपुर सचिव ज्ञानेश्वर लोहकरे, प्रमुख अतिथी माजी सभापती मनोज कोठे, नंदा लोहबरे ,माजी उपसभापती ज्ञानेश्वर चवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे ,निमखेडा सरपंच सुनीता यागंटी, उपसरपंच मनोज झाडे निस्पृह शिक्षण संस्था उपाध्यक्ष सुरेंद्र हटेवार, सचिव अखाडनाथ नानोटकर ,कोषाध्यक्ष सुनील ठाकरे, धनी सरपंच दिनकर नटीये, उपसरपंच अंकित शिंगाडे, माजी सरपंच निमखेडा शिनुजी या घंटी, प्रमोद बरबटे, प्रकाश पल्लेवार, सुरेश अराम सह गावातील परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी ,पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान निमखेडा येथील श्री साईबाबा विद्यालय मुख्याध्यापक आकाश निनावे ,श्री साईबाबा स्कूल ऑफ लर्नर्स मुख्याध्यापक कुमारी पायल ठाकरे सह समस्त शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी वृंद यांनी केले आहे.