अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अविवाहित तरुणाचा मृत्यू

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी रेल्वे स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे फाटक रेल्वे मार्ग किलोमीटर क्र 1111/17 हुन भरधाव अज्ञात धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने एका अविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 9 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव विनय तुलसीदास हुमने वय 38 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनार्थ नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाल्यात अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

Sun Feb 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडाच्या नाल्यात एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी 9 दरम्यान निदर्शनास आली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा कादर झेंडा परिसरातील एका झाडाखाली बसून असायचा.मिळेल त्या आश्रयावर स्वतःचा जीवणायापाण करीत होता .आज सकाळी नऊ दरम्यान सदर अनोळखी वृद्धाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com