लोकसभा निवडणूक : आज 4 उमेदवारांनी दाखल केले नामांकन

यवतमाळ :- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 3 एप्रिल रोजी एकून 4 उमेदवारांनी एकून 5 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले.

नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकून 2 अर्ज, धरम दिलीपसिंग ठाकूर, पक्ष सन्मान राजकीय पक्ष 1 अर्ज, संगिता दिनेश चव्हाण, अपक्ष 1 अर्ज, विशाल शालीकराम वाघ, गोंडवाना गणतंत्र पार्टी 1 अर्ज या उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत एकून 8 उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे.

तसेच आज 16 व्यक्तींनी 32 नामांकन अर्जाची उचल केली. याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकून 91 व्यक्तींनी 164 अर्जाची उचल केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र शासनाचे 17 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Thu Apr 4 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या 17 वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights