नाल्यात अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कादर झेंडाच्या नाल्यात एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी 9 दरम्यान निदर्शनास आली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा कादर झेंडा परिसरातील एका झाडाखाली बसून असायचा.मिळेल त्या आश्रयावर स्वतःचा जीवणायापाण करीत होता .आज सकाळी नऊ दरम्यान सदर अनोळखी वृद्धाचा मृतदेह परिसरातील नाल्यात आढळले असता पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

खसाळा येथे हनुमान मंदिर महाद्वार व सामाजिक सभागृहाचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

Sun Feb 4 , 2024
– धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासणे हे प्रत्येक जनप्रतिनिधीचे कर्तव्य – आ टेकचंद सावरकर कामठी :- शासकीय प्रणालीतून विकास कामे हे होतच असतात परंतु त्यातून धार्मिक व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम जनप्रतिनिधीने केले पाहिजे त्यातूनच गावाच्या विकास घडतो व समाजासोबत समाज जोडण्याचे काम आपोआप होते माजी पालकमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात विकास कामांना गती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com