मनपा आणि लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग अससोसिएशनचे आयोजन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्यावतीने आणि लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग अससोसिएशनच्या सहकार्याने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंती आणि गांधीबाग उद्यानाच्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता गांधीबाग उद्यानात अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कवी संमेलनात आमंत्रित कवींमध्ये सुरेंद्र यादवेंद्र हस्यरस बरन (राजस्थान), नंदकिशोर अकेला हस्यरस रतलाम (माळवा) राकेश वर्मा हस्य व्यंग भोपाळ (मध्य प्रदेश), राम भदावर वीर रास इटावा (उत्तर प्रदेश), प्रियंका रॉय गीत गझल वाराणसी (उत्तर प्रदेश), दमदार बनारसी बनारस (उत्तर प्रदेश) उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंती वर्षात गांधीबाग उद्यानाचे नूतनीकरण आणि उद्घाटन करण्यात आले होते. उद्यानाच्या पहिल्या वर्धापन दिनापासून म्हणजे 1998 पासून दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाला समर्पित अशा अखिल भारतीय कवी संमेलनचे आयोजन करण्यात येते. मागील 24 वर्षांपासून या साहित्य यज्ञामध्ये देशातील सुमारे 119 नामवंत कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले आहे.
यंदाही भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि उद्यानाच्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी सायंकाळी 6.30 वाजता गांधीबाग उद्यानात अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी संमेलनात प्रवेश विनामूल्य असून काव्य रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन संमेलनाच्या आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.