कामठी शहरात गांजा, एमडी व थिनरचा शिरकाव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी शहरातील बहुतांश तरुणाई घातक गांजा,एमडी व थिनर नशेच्या विळख्यात

कामठी :- कामठी शहरात गांजा,चरस,एमडी व व्हाईटनर मध्ये वापरण्यात येणाऱ्या थिनर सारख्या अंमली पदार्थाच्या नशेच्या विळख्यात बहुतांश तरुणाई अडकली असून शिरकाव झालेल्या घातक एमडी,ड्रग्ज कडे तरुणाईचा चांगलाच कल वाढला आहे.ही सत्यता पोलीस नाकारू शकत नाही कारण खुद्द जुनी कामठी पोलिसांनी एमडी तस्कर प्रकरणात कारवाही केली असून एक मोठा रॅकेटचा लवकरच पर्दाफाश होणार असून मागील कित्येक वर्षापासून कामठी शहरात एम डी सारख्या घातक अंमली पदार्थाचा मुंबई वरून तस्करी होत आहे आणि कामठी शहर हे यासारख्या घातक अंमली पदार्थ विक्रीचे मोठे केंद्र ठरले आहे.येथील बहुतांश तरुणांना या ड्रग्ज,थिनर ची लत लागली आहे तर आताही कामठी शहरातून गांजा,चरस ,एम डी ,सारख्या अंमली पदार्थाची महागड्या दराने विक्री करून तरुणांच्या जीवाशी खेळ खेळल्या जात आहे तर दुसरीकडे येथील खाकी वर्दीवाल्या पोलिसांना या अवैध अंमली पदार्थ विक्री ची पूर्णता माहिती आहे मात्र मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे पोलिसही मांजरासारखे डोळे मिटुन दुध पिण्याची भूमिका साकारत आहेत.

नशेखोर तरुणांकडून दारू,गांजा,चरस,हुक्का या माध्यमातून पूर्वी नशेची भूक भागवली जात होती .आता हा युवा वर्ग एम डी,ड्रग्ज, व्हाइट पावडर, व्हाईटनर मध्ये वापरण्यात येणाऱ्या थिनर सारख्या सेवणाकडे वळला असून शहरात पोलिसांच्या अभयपणाने या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याने युवापिढी घातक नशेत गुरफटून जात असल्याने त्यांच्या आरोग्यासह त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग व्हाईटनर मधील थिनर चा उपयोग नशेसाठी करीत आहेत.हे थिनर सहजतेने उपलबद्ध होत आहेत त्यांची किंमत पण कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नशेसाठी या थिनर चा उपयोग सुरू केला आहे.रुमालावर वा कपड्यावर थिनर चे थेंब टाकून हे तरुणाई त्याचा दीर्घ श्वास घेतात त्यामुळे त्यांना चांगलाच नशा चढते .अंमली पदार्थाच्या तुलनेत एमडी ड्रॅग्ज पावडर अतिशय नशा देणारे आहे ज्याची नाळ मुंबई,भिवंडी पासून कामठीत जुळली आहे.कामठीत अवैधरित्या विकणारे हे ड्रग्ज टॅबलेट आणि पावडर या दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जात असून युवापिढी घातक नशेच्या आहारी जात आहेत.तर जुनी कामठी पोलिसांनी नुकतीच एक केलेले कारवाही वगळता इतर अंमली पदार्थाच्या तस्करीकडे पोलीस प्रशासनाकडून कुठलेही नियंत्रण ठेवल्या जात नाही.

  – खाकीलाही तस्करीचे खबर मात्र कारवाही नाही

-शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची पोलिसांना अंतर्भूत माहिती असते.काही अवैध व्यवसायिकाकडून दर महिन्याला बांधून असलेल्या ‘देन’मुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात.कधीकाळी देखावा म्हणून थातुरमातुर कारवाही करून पोलिस प्रसिद्धीपत्रक काढुन स्वतःची पाठ स्वतःच्याच हाताने थोपाटतात.मात्र पोलिसांच्या या भ्रष्ट वृत्तीमुळे अवैध व्यवसायिकांना पाठबळ मिळत असून नशेच्या विळख्यात अडकलेली तरुणाई मृत्यूच्या दारात उभी राहते त्याची कुणालाच चिंता राहत नाही.त्याची चिंता असते फक्त कुटुंबियांना. तर मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे पोलीस वर्ग हे भावनाशून्य झालेले असतात.परिणामी अमली पदार्थाच्या तस्करी ,व व्यसनाईकडे पोलीस अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com