गरीब मुलांना शिक्षणाचा अधिकार द्या-
आम आदमी पार्टीचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयावर धडक
नागपूर :-मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे असे सांगत आज आम आदमी पार्टीने. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. सोबतच उपसंचालक यांचे सहयोगी पाटील यांना निवेदन दिले. यावेळी कोणत्या जिल्ह्यातील किती रक्कम बाकी आहे, हा प्रश्न उपस्थित केला असता कोणीही उत्तर दिले नाही.
‘एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात , परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब, वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे’ अशी टिका आप चे जिल्हा संयोजिका कविता सिंगल यांनी केली.
महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २३-२४ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे असा आरोप यावेळेस विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखडे यांनी केला.
फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासनाच्या दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होते आहे असे प्रतिपादन आप चे महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांनी केले.
शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे. अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला. आज च्या निदर्शनात महाराष्ट्र आय टी सेल चे अध्यक्ष अशोक मिश्रा, शंकर इंगोले, ग्रामीण अध्यक्ष गणेश रेवतकर, भूषण ढाकूलकर, रोशन डोंगरे, अजय धर्मे, सुषमा कांबळे, अमेय नारनवरे, प्रदीप पौनीकर, गौतम कावरे, सोनू फटींग, सचिन लोणकर, रविंद्र गिदोळे, संदीप कोहे, विनीत गजभिये, प्रतीक बावनकर, मोरेश्वर मौंदेकर, संजय बारापात्रे, अजिंक्य कळंबे, प्रीती शंभरकर, सुरेश खरचे, सचिन पारधी, शिरीष तिडके, कुंदन कानफाडे, भारत जवादे, मनोज डोंगरे, संजय जीचकर, स्वप्निल सोमकुवर, चेतन भोसले, राजकुमार पखिंडे, संजय राऊत, संदीप कोहे, स्वाती चौधरी, प्रीती शंभरकर, अमर बातो, संगीता बातो, सचिन अहिरवार, कल्पना भावसार, गणेश रेवतकर जिल्हा संयोजक (नागपुर ग्रामीण), ईश्वर गजबे जिल्हा सचिव अतुल निकोसे जिल्हा सहसचिव ,संजय राऊत सावनेर संयोजक सुभम बागडे, विनीत गजभिये, गजु चौधरी, महेश बोधीलिया , छत्रपती लांबट,भूषण रेवतकर, जामुवंत वारकरी, रूही शेख, पद्मा बनकर, कमलाकर अवचट आदी सामील झाले होते.