‘लोकराज्य’चा कृषी विशेषांक प्रकाशित

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल-मे 2023 च्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या विशेषांकामध्ये कृषी, फलोत्पादन, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सहकार व पणन, मृद व जलसंधारण आदी विभागाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याच बरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विशेष लेख तसेच महत्त्वाच्या घडामोडी, ‘मंत्रिमंडळात ठरले’ या सदरांचाही समावेश या अंकात आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर हा अंक वाचकांसाठी उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

45 Youths from Punjab meet Maharashtra Governor under 'Yuva Sangam'

Tue May 9 , 2023
Mumbai :- A group of 45 youths from the State of Punjab visiting Maharashtra as part of ‘Yuva Sangam’ initiative started by the Prime Minister interacted with Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Tue (9 May). Welcoming the students to Maharashtra, Governor Bais said Maharashtra and Punjab have shared a long tradition of spiritual and cultural exchanges […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com