संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत 25 जून पासून कामठी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने कामठी तालुक्यातील टेमसना टेमसना येथे ‘कृषी संजीवनी सप्ताह ‘ निमित्त सभा घेण्यात आली.
सभेमध्ये ” कृषी क्षेत्राची भावी दिशा ” याबाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सदर सभेला अध्यक्ष म्हणून टेमसना ग्रामपंचायतचे सरपंच अनिकेत शहाणे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच वडोदा मंडळ कृषी अधिकारी सुहास आंबुलकर , कृषी पर्यवेक्षक विलास गावंडे, दिघोरी चे कृषी सहाय्यक अश्विनी साखरे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून शेतीच्या भावी दिशेबद्दल उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना चर्चेद्वारे जाणून घेतल्या.
याप्रसंगी सरपंच अनिकेत शहाणे व मंकृअ अंबुलकर यांच्या हस्ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीतधान्य, सोयाबीन प्रकल्पा अंतर्गत बियाणे वाटप करण्यात आले. तसेच पी एम किसान सन्मान योजनेची माहिती,महाडीबीटी योजना तसेच सूक्ष्म सिंचन योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यांत आले.यावेळी ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते