पत्नी माहेरी गेल्यानंतर साळीला केले गर्भवती

नागपूर :- पत्नीशी वाद झाल्यानंतर माहेरी निघून गेली. त्यानंतर मात्र,त्याने साळीला घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर पितळ उघडे पडले. या प्रकरणी साळीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. लंकेश (बिना डोरली) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.

शेतमजूर असलेल्या लंकेश याचे सहा वर्षांपूर्वी नागपुरातील नंदनवनमध्ये राहणाऱ्या तरूणीशी लग्न झाले. त्यांना दोन मुली आहेत. पत्नीशी नेहमी वाद होत असल्यामुळे ती वारंवार माहेरी जात होती. त्यामुळे लंकेश सासूरवाडीत अनेकदा मुक्कामी थांबत होता. यादरम्यान, पीडित १८ वर्षीय साळी सोनम (काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले. लंकेश नेहमी सोनमशी जवळीक साधून चाळे करीत होता. बहिणीचा पती असल्यामुळे ती सहन करीत होती. दरम्यान, तीसुद्धा लंकेशच्या प्रेमात पडली. दोघांच्याही भेटी वाढल्या. जून महिन्यात सासरी आलेल्या लंकेशने अंधाराचा फायदा घेत सोनमशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून दोघेही वारंवार संबंध ठेवत होते. रविवारी सोनमच्या पोटात दुखत असल्याने तिला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी करून ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

आईने तिला विचारणा केली असता तिने बहिणीच्या पतीचे नाव सांगितले.त्यानंतर आईने सोनमसह नंदनवन पोलीस स्टेशन गाठले. लंकेशविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोहमार्ग ठाण्यात दारूसाठा नष्ट

Tue Oct 10 , 2023
– इन कॅमेरा साडेतीन हजार बॉटल रिकाम्या नागपूर :- न्यायालयाच्या आदेशाने एक लाख 53 हजार 343 रुपये किंमतीचा दारूसाठा सोमवारी दुपारी नष्ट करण्यात आला. लोहमार्ग पोलिस ठाण्यात नियमानुसार इन कॅमेरा तीन हजार 443 बॉटल रिकाम्या करण्यात आल्या. यासाठी पोलिस कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. 2017 ते 2023 या सहा वर्षातील दारूसाठा लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या मालखान्यात जमा होता. यात 12 गुन्ह्यातील दारूसाठा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!