नागपूर :- अदित्री पायसी आणि संजना जोशी यांनी खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील आणि 17 वर्षावरील वयोगटात सुवर्ण पदकाची ‘हॅट्ट्रिक’ साधली.
रविवारी अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलावामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटात अदित्री पायसीने 100 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर फ्री स्टाईल आणि 200 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर संजना जोशीने मुलींच्या 17 वर्षावरील वयोगटात 200 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर बटरफ्लाय आणि 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले.
अदित्रीने 100 मीटर बटरफ्लायमध्ये 01:25:43 ही सर्वोत्तम वेळ नोंदवित बाजी मारली. तिच्यापाठोपाठ इशानी बावनकुळे (01:54:39) आणि प्रिशा काळमेघ (01:54:82) ने दुसरे व तिसरे स्थान पटकावले. 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये अदित्री (01:11:45) प्रथम तर प्रेरणा चापले (01:14:41) आणि प्रिशा काळमेघ (01:16:15) अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिली. 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये आदित्री (02:41:64) पाठोपाठ त्रिशा काळमेघ (02:52:71) आणि इशानी बावनकुळे (03:08:04) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
17 वर्षावरील वयोगटात संजनाने 100 मीटर बटरफ्लायमध्ये 01:17:01 ही सर्वोत्तम वेळ नोंदवित प्रथम, स्नेहल जोशी (01:26:73)ने द्वितीय आणि अक्षता झाडे (01:41:70)ने तृतीय क्रमांक प्राप्त केला. 200 मीटर बटरफ्लायमध्ये संजना (03:14:21) पाठोपाठ स्नेहल जोशी (03:19:71) आणि अक्षता झाडे (03:48:09) ने दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये संजना जोशी (02:34:29)ने प्रथम, रिद्धी परपार (02:39:15)ने द्वितीय आणि स्नेहल जोशी (02:44:25)ने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
17 वर्षाखालील वयोगटात सिद्धार्थ संगाने 100 मीटर बटरफ्लाय आणि 100 मीटर फ्रीस्टाईल विजेतेपदे मिळवले. फ्रीस्टाईलमध्येही, संगा (01:01:60) वेद पिंपळकर (01:06:28) आणि (आरव दावडा) या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस ठरला.
निकाल: (प्रथम, द्वितीय व तृतीय)
200 मीटर बटरफ्लाय (14 वर्षाखालील मुले): रणबीरसिंग गौर, आदित्य शर्मा, हर्ष कुलकर्णी. मुली: जान्हवी धुर्वे, रिया शिंदे, तिशा रहेले.
50 मीटर बटरफ्लाय (11 वर्षाखालील मुले) :अरहान खान, ध्रुव मारिया,शिव नागपुरे. मुली: सावी पाटील, भक्ती थेपेकर, साईशा वरंभे.
बटरफ्लाय (9 वर्षाखालील मुले) : अनुभव शर्मा, शिरीष सावनकर, रुहाना वाघमारे. मुली : अर्शती चिंदमवार, देवांशी आस्टनकर, अन्वी कोल्हे.
200 मीटर फ्री स्टाईल (35 वर्षांवरील पुरूष): अश्विन मोकासी, अमित पोरवाल, खेमराज नागपुरे.
200 मीटर फ्री स्टाईल (17 वर्षावरील मुले) : तुषार परमार, यश गुल्हाने, रुद्र पलकृत. मुली: संजना जोशी, रिद्धी परमार, स्नेहल जोशी.
200 मीटर फ्री स्टाईल (14 वर्षाखालील मुले): हृदय गर्ग, सागर चापले, आदित्य शर्मा. मुली: साची फुलझेले, मृण्मयी अनिवाल, श्रीयांशा धोंडारकर.