अवैधरीत्या देशी दारू वाहतुक तसेच मोहाफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कार्यवाही

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीसानी पेट्रोलींग दरम्यान गुप्त माहिती व्दारे निलज (खंडाळा) येथे अवैद्यरित्या देशी दारू वाहतुक करणारा व केरडी शेत शिवारात मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली.

सोमवार (दि.४) मार्च २०२४ ला कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत निलज (खंडाळा) पोलीस कर्मचारी पेट्रोलीग करित असताना प्राप्त गोपनीय माहितीवरून आरोपी राजेश रामदास चकोले वय ४३ वर्ष रा. निलज ( खंडाळा) हा देशी दारू बाळगताना मिळुन आल्याने त्याचे कडुन १३ निपा देशी दारू ९० एमएल च्या किंम त ४५५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी राजेश चकोले विरूद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधि नियम व कलम ६५ (बी)(सी)(इ)(एफ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात आली आहे. तसे च केरडी शेत शिवारात मोहाफुल गावठी दारू गाळ णाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. आरोपी अरविंद कवडु मानवटकर रा. साटक हा अवैधरित्या मोहाफुल रसायन सडवा बाळगतांना मिळुन आला. आरोपीचे ताब्यातुन एकुण ५० लिटर ड्रम मध्ये मोह फुल सडया प्रत्येकी लिटर ४० रू. प्रमाणे २००० रूप याचा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. आरोपी अरविं द मानवटकर विरुद्ध पो.स्टे कन्हान येथे कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दोन्ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे कन्हान चे ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश पाटील पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत

Wed Mar 6 , 2024
▪️जिल्हा दंडाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांचे आदेश ▪️नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन नागपूर :- नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथे गत काही दिवसांपासून कोंबड्यांमध्ये तुरळक मरतुकीचे प्रमाण आढळून आले. २ मार्च रोजी मरतुक जास्त प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. जी मरतुक झाली त्याचे नमुने NIHSAD भोपाल येथे पाठविण्यात आले होते. तपासणीअंती नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com