अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाव्दारे घेण्यात येणा-या उन्हाळी -2023 च्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दुरुस्ती/सुधारित / नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून यासंबंधी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे.
तरी याची सर्वसंबंधित विद्यार्थी, महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्र यांनी नोंद घ्यावी, अधिक माहिती हवी असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील 9763833969 यांचेशी संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.