जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी तसेच, खंडणी मागणारे आरोपी यांचे एकमेकांविरूध्द गुन्हे दाखल, एकूण ६ आरोपींना अटक

नागपूर :-पोलीस ठाणे सिताबर्डी ह‌द्दीत आनंद नगर, न्यु बॉम्बे स्कुटर शॉप मागे, सिताबर्डी येथे राहणारा मृणाल मथुर गजभिये, वय २९ वर्षे, याचा ४ ते ५ महीन्यापासुन जैन्युअल सलिम कुरैशी, वय ३० वर्षे, रा. गड्‌डीगोदाम, नागपुर याचेसोबत पैशाचे लेन-देन वरून वाद सुरू होता. दिनांक ०३.०४.२०२४ ने ०७.४५ वा. चे सुमारास, जैन्युअल कुरैशी, हा त्याचा मित्र नागे समिर दुधानकर, रा. हुडकेश्वर, नागपुरसह मृणाल याचेसोबत बोलण्याकरीता त्याने गराजवळ आला होता. काही वेळाने जैन्युअल चे मित्र नामे नितीन संतोष गुप्ता, वय २९ वर्षे, रा. गणेश हाऊस, बुटी चॉल, गड्‌डीगोदाम चौक, सदर व त्याचेसोबत राहुल प्रदीप गोंडाणे, वय २२ वर्षे, रा. आयनॉक्स मॉल मागे, इंदोरा चौक, पाचपावली, नागपुर हे सुध्दा तेथे आले असता, मृणाल याने नितीन गुप्ता याला ठोसा मारून स्वतः ये कमरेतुन माऊझर काढुन त्यानेवर फायर केला. त्याचा नेम चुकला तेव्हा नितीन याने मृणाल ला पकडले मृणालने जैन्युअल याचे पोटावर फायर केला. जखमी जैन्युअल ने मृणाल चे हातातील माऊदार हिसकावुन घेतली व तेथुन जखमी अवस्थेत निघुन गेला. दरम्यान फायर वा आवाज ऐकुण तेथे मृणाल ये आई, बहीण, व वडील नामे मयुर लक्ष्मण गजभिये, वय ५१ वर्षे, तसेच अंशुल जगतनारायण सिंग, वय २६ वर्षे, व राजा खान अब्दुल गफार, वय ३१ वर्षे, दोघेही रा. गोवा कॉलोनी, मंगळवारी बाजार, सदर, नागपुर हे तेथे आले. त्यांनी नितीन गुप्ता यास शिवीगाळ करून हातबुक्कीने मारपिट केली. तसेच, जैन्युअल हा माउदार परत आणेपर्यंत न सोडण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी नितीन गुप्ता याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे मपोउपनि जगताप ७३७८८४९१५४७ यांनी आरोपीविरुध्द कलम १४३, १४७, ३०७, ३६४, ३४२, ३२३, २९४, ५०६ भा.द.वि. सहकलम ३. २५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवून, आरोपी क. १) मृणाल मयुर गजभिये, वय २९ वर्षे, २) मयुर लक्ष्मण गजभिये, वय ५१ वर्षे, ३) अंशुल जगतनारायण सिंग, वय २६ वर्षे, ४) राजा खान

अब्दुल गफार, वय ३१ वर्षे, दोघेही रा. गोवा कॉलोनी, मंगळवारी बाजार, सदर, नागपुर यांना अटक केलेली आहे. तसेच, मृणाल मयुर गजभिये, वय २९ वर्षे, याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे आरोपी क. १) जैन्युअल सलिम कुरैशी, वय ३० वर्षे, रा. गड्डीगोदाम, नागपुर २) नितीन संतोष गुप्ता, वय २९ वर्षे, रा. गणेश हाऊस, बुटी चॉल, गड्‌डीगोदाम चौक, सदर, नागपुर ३) राहुल प्रदीप गोंडाणे, वय २२ वर्षे, रा. आयनॉक्स मॉल मागे, इंदोरा चौक, पाचपावली, नागपुर ४) समिर दुधानकर, रा. हुडकेश्वर, नागपुर यांचेविरूध्द कमल ३८५, २९४, ३२३, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपी क. २ व ३ यांना अटक केली आहे. आरोपी क. १ याचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे सुरू आहे. इतर आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद,वाहनासह एकूण ९०,९३,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Thu Apr 4 , 2024
– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कारवाई भिवापूर :-दिनांक ०१/०४/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे भिवापूर हहीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलीस ठाणे भीसी जिल्हा चंद्रपूर कडून भिवापूर मार्गे अमरावतीकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती एलपीमध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून सालेभ‌ट्टी फाट्याजवळ नाकाबंदी केली असता दोन संशयित टिप्पर एकामागे एक येतांनी दिसुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights