जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- दिनांक २०.०५.२०२३ से २२.३० वा. चे सुमारास फिर्यादी जतीक मधुकर झाडे वय २२ वर्ष रा. धामना, जि. नागपूर याचा वाढदिवस असल्याने तो त्याचे मित्र नामे १) सागर दत्तुज डोंगरे व २२ वर्ष २) आदित्य ओमकार निपोट वय २३ वर्ष दोन्ही रा. सातनवरी ३) शुभम सुनिल जोध वय २६ वर्ष रा. वानाडोंगरी ४) करण भिमराव मोहिते वय २६ वर्ष रा. हिंगणा यांचेसह पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत अमरावती रोड, अमरजित पंजाबी ढाबा, धामना येथे जेवण करण्यास आले होते. जेवणाची वाट पाहत असलेले असता त्यांचे टेबलसमोर आरोपी क. १) अभिषेक आमदरे याने येवून फिर्यादी व मित्र यांचे सोबत असलेल्या जुन्या वादाचे कारणावरून भांडण व शिवीगाळी केली. तसेच मला मारायची हिम्मत असेल तर या मला मारा असे म्हटले त्यामुळे त्याचे सोबत बाचाबाची होवुन ते सर्वजन रोडने पलीकडे गेले असता तेथे आरोपीचे साथिदार आरोपी क. २) अलकेश गजभिये ३) बादल लोनारे ४) रोहीत खंडारे ५) धम्मशील कांबळे सर्व रा. धामना जि नागपूर यांनी भांडण करून धक्काबुक्की केली. आरोपी अलकेश गजभिये याने त्याचे दोन्ही हातातील चाकुने करण मोहिते याला डावे फसलॉवर मारले, शुभम जोध सोडविण्यास गेला असता त्याचे उजवे हाताला चाकुने मारून जखमी केले. रक्त निघत असल्याने फिर्यादीने अॅक्टीव्हा गाडीवर त्या दोघांना घेवून दत्तवाडी येथील हॉस्पीटल मध्ये आले असता त्यांचे मागुन अॅम्बुलन्स मध्ये समीर गेडाम हा जख्मी सागर डोंगरे व आदित्य निघोट यांना घेवून आला. आरोपी अकलेश याने सागर डोंगरे याचे पोटावर व आदित्य याचे डावे बगलेवर चाकुने मारून गंभीर जखमी केल्याचे समीर गेडाम याने सांगीतले. सर्व जख्मीना उपचाराकरीता सेनगुप्ता हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. आरोपींनी गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी व त्याचे मित्र यांना जुन्या भांडणाचे कारणावरून जिवे ठार मारण्याचे उद्देश्याने चाकुने वार करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे सपोनि तेलरांधे यांनी आरोपीविरूध्द कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४ भा.दं. वो सहकलम ३७(२) १३५ म.पो. का. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com