नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत जिम्नॅस्टिक स्पर्धेचे शनिवारी (ता.२०) धनवटे नॅशनल कॉलेज येथे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. अमोल देशमुख, रूपा रंजीत देशमुख, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सहसचिव दिपक बारड, पुरूषोत्तम दारव्हनकर, मयुरेश सिरसीकर, संकेत विंचुरकर, सर्वेश वाघमारे, रजत मुंडे, मंथन भलावी, वरुण काळे, पायल झिटे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.